भीषण विमान अपघातानंतर केरळला आणखी मोठा धक्का, ड्रोन VIDEO पाहून भरेल धडकी

भीषण विमान अपघातानंतर केरळला आणखी मोठा धक्का, ड्रोन VIDEO पाहून भरेल धडकी

पर्यटन हाच केरळच्या अर्थव्यवस्थेला मुख्य आधार आहे. त्यात सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्य आर्थिक संकटात सापडलं आहे.

  • Share this:

कोट्टायम 9 ऑगस्ट: भीषण विमान अपघातात हादरलेल्या केरळला दुसरा मोठा धक्का बसल आहे. गेल्या 24 तासांपासून राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून मोठा भाग जलमय झाला आहे. कोट्टायममध्ये आलेल्या महापूराचं ड्रोन फुटेज हे धडकी भरवणारं असून अनेक गावं पाण्याखाली गेले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने राज्याला मोठा फटका बसला होता. त्याचीच आठवण या पुराने करून दिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पासून सुरु आहे. त्यामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहे. कोरोनाचं संकट, त्यानंतरचा लॉकडाऊन, भुस्खलनामुळे झालेली जिवित हानी, नंतरचा भीषण विमान अपघात आणि आता महापूर यामुळे राज्याला जोरदार तडाखा बसला आहे.

पर्यटन हाच केरळच्या अर्थव्यवस्थेला मुख्य आधार आहे. कोरोनामुळे त्यालाच फटका बसला. त्यात सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती त्यामुळे राज्य आर्थिक संकटात सापडलं आहे. या महापूरामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

दरम्यान,  केरळमधल्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर नेमकं काय झालं त्याची माहिती आता समोर आली आहे. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 150 जण जखमी झाले आहेत.

विमानतळावर तैनात असलेल्या CISFच्या जवानांनी ही माहिती दिली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. NDTVने याबाबतचं वृत्त CISFच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. रात्री 7.40 मिनिटांनी विमान धाव पट्टीवरून घसरलं आणि पुढे जाऊन त्याचे दोन तुकडे झाले.

7.41 - CISFच्या जवानांनी ही माहिती एअर ट्राफिक कंट्रोल आणि (ATC) बचाव कार्य करणाऱ्या पथकाला दिली.

7.42 – विमानतळावरच्या फायर ब्रिगेडच्या पथकाला विमानाच्या अपघाताची सूचना देण्यात आली.

7.43 – CISFच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरच्या आरोग्य पथकाला या अपघाताची माहिती कळवली आणि तातडीने पोहोचण्याची विनंती केली.

7.44 – CISFच्या कंट्रोल रुममधून विमातळावरच्या सर्व अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली. शनिवारी या परिसराची केंद्रीय हवाई मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी पाहणीही केली होती.

7.45 – CISFच्या कंट्रोल रुममधून स्थानिक पोलिसांना या अपघाताची माहिती दिली गेली.

घटनेच्या दिवशी सगळ्याच यंत्रणांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केल्याने प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 9, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या