ऐकावे ते अजबच! लग्नाआधी सेक्स केल्याने होतो एड्स, सरकारी शाळेच्या पुस्तकातील ज्ञान

ऐकावे ते अजबच! लग्नाआधी सेक्स केल्याने होतो एड्स, सरकारी शाळेच्या पुस्तकातील ज्ञान

  • Share this:

तिरुवनंतपुरम,6 मार्च : लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स रोगाची लागण होते, असे भलतंच ज्ञान सरकारी शाळेच्या पुस्तकात पाजळण्यात आले आहे. केरळच्या सरकार शाळेतील दहावीच्या बायोलॉजी विषयाच्या पुस्तकातील एका धड्यामध्ये हे अजब तर्कट मांडण्यात आले आहे. संबंधित धड्यामध्ये एड्स होण्यामागील चार कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. कारणांमध्ये लग्नाआधी अथवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो, अशी अजबच माहिती छापण्यात आली आहे.

एचआयव्ही विषाणूंची माहिती देणाऱ्या या धड्याचा फोटो पलक्कडमधील डॉक्टर अरूण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी शिक्षण विभागाला टार्गेट करण्यास सुरूवात केली. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित चूक दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संशोधन अधिकारी निशी यांनी सांगितले की, पुस्तकात छापण्यात आलेली चूक आमच्या लक्षात आली असून ती तातडीने दुरूस्त करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रातील पुस्तकांमध्ये हा मुद्दा दिसणार नाही'.

बायोलॉजीचं हे पुस्तक शैक्षणिक वर्ष 2015-16मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी या चुकीच्या माहितीचा अभ्यास करत आहेत. दरम्यान, पुस्तकात छापण्यात आलेल्या माहितीचा मसूदा आताच्या टीमने तयार केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published: March 6, 2019, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading