त्या गर्भवती हत्तीणीला मारणारे 3 संशयित ताब्यात; चौकशी सुरू

त्या गर्भवती हत्तीणीला मारणारे 3 संशयित ताब्यात; चौकशी सुरू

माणुसकीला काळीमा फासणारी घटना केरळमध्ये घडली होती. एका मुक्या जीवाला त्यांनी अननसातून फटाके खाऊ घातले होते. यात तिचा व तिच्या पोटातील निरागस जीवाचा मृत्यू झाला

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जून : केरळ (Keral) मध्ये गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने तिचा अत्यंत दुर्देवी पद्धतीने मृत्यू झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्यंत क्रुर कृत्याचा निषेध केला जात आहे. सोशल मीडियावरही यावरुन बराच विरोध सुरू आहे. दरम्यान या हत्तीणीच्या हत्ये प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, गुरुवारी मानकरगड वन पथकाने याआधी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मात्र आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणाले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार फटाक्यांमुळे हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. “आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्या प्रकारे लपटून दिले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येईल.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले की, केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींणीला फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीणीला खायला दिले होते, त्यांना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

हे वाचा-नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

महाराष्ट्राच्या लॉकडाऊन नियमावलीत पुन्हा बदल; असे आहेत नवे नियम

First published: June 4, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading