5 जुलैला तिरुवनंतपुरममध्ये कस्टम विभागाने तब्बल 14. 82 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. तेव्हापासून केरळात हे गोल्ड स्मगलिंग प्रकरण गाजत आहे. काही राजकीय आणि प्रशासकीय हस्तकांना हाताशी धरून सोन्याचं स्मगलिंग होत असल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी NIA तपास करीत आहे आणि आतापर्यंत या प्रकरणात किमान 20-22 जणांना NIA ने ताब्यात घेतलं आहे. केरळची राजधानी तिरुवनंतरपुरममध्ये 30 किलो सोनं जप्त केलं गेलं आणि त्यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू झाली. आता याच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. डिप्लोमॅटिक बॅगेजचा म्हणजे राजनैतिक अधिकारी असल्याचा शिक्का असलेल्या बॅगेतून हे सोनं केरळमध्ये आलं होतं. त्यामुळे या प्रकरणात किती बड्या हस्तींचा हात असू शकतो याविषयी चर्चा सुरू आहे. मलाप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांमधल्या काही जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. मलाबार ज्वेलरी, अमीन गोल्ड या प्रसिद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध ब्रँडची या प्रकरणी चौकशी सुरू आहे.#WATCH Kerala Police cane-charged Youth Congress workers who were staging a protest demanding resignation of Chief Minister Pinarayi Vijayan over the gold smuggling case, in Wayanad. pic.twitter.com/i3Gyp4LVbW
— ANI (@ANI) August 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.