Home /News /national /

अर्धनग्न होत रेहाना फातिमाने स्वत:च्या मुलांना करू दिले 'बॉडी पेंटिंग', व्हायरल VIDEOनंतर गुन्हा दाखल

अर्धनग्न होत रेहाना फातिमाने स्वत:च्या मुलांना करू दिले 'बॉडी पेंटिंग', व्हायरल VIDEOनंतर गुन्हा दाखल

केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी चर्चेत आलेली महिला कार्यकर्ती रेहाना फातिमा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिने शेअर केलेल्या अर्धनग्न व्हिडीओमुळे पुन्हा एकदा फातिमाचंं नाव चर्चेत आले आहे.

    कोट्टयम, 24 जून : केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी चर्चेत आलेली महिला कार्यकर्ती रेहाना फातिमा (Rehana Fatima) पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिने शेअर केलेल्या अर्धनग्न व्हिडीओमुळे पुन्हा एकदा फातिमाचंं नाव चर्चेत आले आहे. तिने तिच्या मुलांसमोर अर्धनग्न होत त्यांना स्वत:च्या शरिरावर पेंटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रेहाना विरोधात थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. पोलिसांनी सेक्शन आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक मार्गाने लैंगिक कंटेट प्रसिद्ध करणे) आणि जुवेनाइल जस्टिस कायद्याच्या सेक्शन 75 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार यासंदर्भात थिरुवल्ला येथील वकील अरुण प्रकाश यांनी तक्रार दाखल केली होती. (हे वाचा-Mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात मिळतील 2 कोटी? वाचा सविस्तर) रेहाना फातिमाने हा व्हिडीओ शेअर करताना 'बॉडी आर्ट आणि राजकारण' (Body Art and Politics) असं कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिची दोन्ही मुलं तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, 'जेव्हा त्यांची आई डोळ्याच्या समस्येमुळे काहीसा आराम करत होती, त्यावेळी तिच्या मुलांनी तिला Cool बनवण्याठी फिनिक्स पक्षाचे पेंटिग करण्याचा निर्णय घेतला.' सध्याच्या समाजात महिला कपड्यांमध्ये देखील सुरक्षित नाही आहेत. एखाद्या स्त्रीचे शरीर काय आहे किंवा लैंगिकता काय आहे याबाबत उघडपणे बोलले पाहिजे असे म्हणणे रेहानाने या व्हिडीओतून मांडले आहे. (हे वाचा-अरेरे! आजोबांच्या नोकरीवर नातवाचा डोळा, सुपारी देऊन केली त्यांची हत्या) ती पुढे म्हणाली की, लैंगिकतेबाबत चुकीच्या संकल्पनांविरोधात घरापासूनच सुरुवात झाली तर बदल होऊ शकतो. दरम्यान रेहानाच्या हा व्हिडीओवर खूप टीका केली जात आहे. मात्र काही अंशी तिच्या पोस्टचे कौतुक देखील होत आहे. VIDEO
    First published:

    Tags: Rehana fahatima

    पुढील बातम्या