हाय अलर्ट! फानी चक्रीवादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा

हाय अलर्ट! फानी चक्रीवादळाचा 'या' राज्यांना बसणार तडाखा

येत्या 36 तासांत मोठ्या चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : येत्या दोन दिवसात फानी चक्रीवादळ रौद्र रूप धारण करण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.पुढील 36 तासात मोठ्या चक्रीवादळाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. 1 मेपर्यंत हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीकडे वेगानं सरकण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील अनेक राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी (2 मे) या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. फानी वादळामुळे केरळ आणि ओडिशासह मोठ्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, तामिळनाड़ू आणि पश्चिम बंगालला पाऊस आणि वादळाचा तडाखा बसू शकतो.

वादळाचा सामना करण्यासाठी भारतील लष्कर आणि नौदल सज्ज झाले आहे. भारताच्या तीनही संरक्षण दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार फेनी चक्रीवादळ 4 मे रोजी ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकतं. फानी सोमवारी रात्री बंगालच्या उपसागरात पोहोचले असून ते चेन्नईपासून 700 किमी अंतरावर होतं. त्यानंतर 18 किमी प्रतितास वेगानं वादळ किनाऱ्याकडे सरकत आहे. याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने येईल. त्यानंतर पुढे ओडिशाच्या किनारपट्टीला ध़डकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 4 मे रोजी पहाटे किंवा 3 मे रोजजी संध्याकाली ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकते. नेमकं कोणत्या ठिकाणी वादळ धडकेल हे हवामान विभागानं स्पष्ट केलं नाही.

ओडिशाच्या किनारपट्टीवर फानी धडकल्यास त्याचा वेग 170 ते 180 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान पोहोचू शकतं. किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊ शकते.

फानी वादळामुले ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीसह काही भागात पावसाची शक्यता आहे.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...

First published: April 30, 2019, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading