Home /News /national /

VIDEO: मच्छीमारांबरोबर राहुल गांधींनीही समुद्रात मारली उडी, पोहण्याचा घेतला आनंद

VIDEO: मच्छीमारांबरोबर राहुल गांधींनीही समुद्रात मारली उडी, पोहण्याचा घेतला आनंद

काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे केरळमधील (Rahul Gandhi at Kerala) काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    कोल्लम, 25 फेब्रुवारी: काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे केरळमधील (Rahul Gandhi at Kerala) काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी केरळमधील काही मच्छीमारांसमवेत समुद्रात डुबकी घेतली (Congress leader Rahul Gandhi took a dip in the sea with fishermen in Kollam) आहे. त्याआधी बोटीमधून ते केरळच्या कोल्लम समुद्रकिनारी पोहोचले होते. जेव्हा मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी जाळं पाण्यात टाकलं तेव्हा त्यांच्याबरोबर राहुल गांधी देखील पाण्यात उतरले. जवळपास 10 मिनिटं त्यांनी त्याठिकाणी पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतला. यावेळी राहुल गांधींबरोबर त्यांचे खाजगी अंगरक्षक देखील होते. पाण्यात जाळं फेकल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं की काही मच्छीमार देखील पाण्यात उडी मारत आहेत, तेव्हा त्यांनी देखील डुबकी मारली. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. 24 फेब्रुवारीचा हा व्हिडीओ आहे. पाहा VIDEO यानंतर राहुल गांधी थंगासेरी किनाऱ्यावर परतले. यावेळी देखील त्यांच्याबरोबर काही मच्छीमार होते. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी त्यांनी ब्रेड आणि माशांचा देखील आस्वाद घेतला. बोटीवरच हे अन्न त्या मासेमारांनी तयार केलं होतं. राहुल गांधींचा हा अंदाज पाहून मासेमार देखी सुखावले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Congress, Kerala, PHOTOS VIRAL, Rahul gandhi, Social media

    पुढील बातम्या