Home /News /national /

105 वर्षांच्या आजी 75 टक्के गुण मिळवत चौथीची परीक्षा उत्तीर्ण

105 वर्षांच्या आजी 75 टक्के गुण मिळवत चौथीची परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. अगदी कंटाळा येतो. अनेकांना आपली शाळा आठवून आनंद होतो, मात्र त्याच शाळेतील परीक्षा आठवली की आजही घाम फुटतो. पण केरळमध्ये एका अशा विद्यार्थीनीने परीक्षा दिली आहे, की ते ऐकुन तुम्ही नक्कीच चाट पडाल.

पुढे वाचा ...
    केरळ, 5 फेब्रुवारी : परीक्षा म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. अगदी कंटाळा येतो. अनेकांना आपली शाळा आठवून आनंद होतो, मात्र त्याच शाळेतील परीक्षा आठवली की आजही घाम फुटतो. पण केरळमध्ये एका अशा विद्यार्थीनीने परीक्षा दिली आहे, की ते ऐकुन तुम्ही नक्कीच चाट पडाल. या विद्यार्थीनीने चौथीची परीक्षा दिली आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाली. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 74.5 टक्के गुण मिळवत ही विद्यार्थीनी उत्तीर्ण झाली. आता तुम्ही म्हणाल, चौथीची परीक्षा उत्तीर्ण होण्यात काय मोठं कतृत्व? पण या विद्यार्थीनीचं वय जर तुम्ही ऐकलंत तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील कोल्लममध्ये एका आजीबाईंनी चौथीची परीक्षा दिली आहे. 105 वर्षांच्या या आजीबाईंनी परीक्षा दिली आणि त्यांनी 74.5 टक्के गुणदेखील मिळवले आहेत. पराकुलम याठिकाणी राहणाऱ्या भागीरथी अम्मांनी हा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. ज्या वयात अनेकजण देवदर्शन करण्याची स्वप्न पाहतात, त्या वयात या आजींनी शिक्षणाची कास धरली आहे. चौथीची परीक्षा पास होणारी केरळमधील सगळ्यात मोठी विद्यार्थीनी असण्याचा मान या भागीरथी अम्मांना मिळाला आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या आजीबाईंच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू उमटलं आहे. भागीरथी अम्मांना मिठाई भरवत त्यांनी आपला आनंद साजरा केला आहे. कुटुंबातील सगळ्यात छोटा सदस्य असणाऱ्या चिमुरडीने सगळ्यात मोठ्या सदस्याला म्हणजेच अम्मांना मिठाई भरवतानाचा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये असताना परीक्षेला कंटाळणाऱ्या सर्वांनीच भागीरथी अम्मांचा आदर्श घेणं गरजेचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या