Home /News /national /

'या' राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, नाराज नेते करणार शरद पवारांशी चर्चा

'या' राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, नाराज नेते करणार शरद पवारांशी चर्चा

विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या नाराजीची दखल घेतली आहे.

  तिरूवनंतपुरम, 11 फेब्रुवारी : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. पालाचे आमदार मणि सी कप्पन (Mani C. Kappan) यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट (UDF) आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस डाव्या पक्षांच्या नेतृत्त्वाखालील सत्तारुढ लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटचा (LDF) घटक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केरळमधील पक्षांतर्गत नाराजीची दखल घेतली आहे. त्यांनी नाराज आमदार कप्पन यांच्यासह केरळचे प्रदेशाध्यक्ष टी.पी. पितांबरण (T.P. Peethambaran) यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावलं आहे. काय आहे नाराजीचं कारण? केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन (Pinarayi Vijayan) यांनी पाला विधानसभेची जागा कप्पन यांना सोडण्यास नकार दिला आहे. कप्पन यांनी पालाच्या ऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा निर्णय LDF नं घेतला आहे. विजयन यांनी या निर्णयाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना फोनवरुन दिली आहे. त्यामुळे कप्पन यांचा गट नाराज आहे.

  (वाचा - अविवाहित पुरुषांशी खोटं लग्न करणाऱ्या तरुणींच्या टोळीला पुण्यात अटक)

  कप्पन यांनी सत्तारुढ LDF मधील सुस्तपणावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीमधील या सुस्तपणाचा फटका पालामध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसला असल्याचा त्यांचा दावा आहे. पाला विधानसभेची जागा केरळ काँग्रेस (M) पक्षाला देण्याचा आघाडीचा निर्णय देखील कप्पन यांना मान्य नाही. कप्पन यांचं पालामध्ये वेगळं सत्ताकेंद्र निर्माण होऊ देण्यास डाव्या पक्षाचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती.

  (वाचा - गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या किराणा दुकान चालवलं, आता कमावतोय करोडो)

  काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील UDF आघाडीनं कप्पन यांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांना आघाडीत सहभागी होण्याचा निमंत्रण दिलं आहे. त्याचबरोबर केरळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जिल्हा शाखांचाही कप्पन यांना पाठिंबा आहे. त्यामुळे येत्या 13 फेब्रुवारी रोजी कप्पन आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील असा अंदाज आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Kerala, NCP, Sharad pawar

  पुढील बातम्या