मराठी बातम्या /बातम्या /देश /18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काहीतरी, कोरोनामुळे झालं उघड

18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काहीतरी, कोरोनामुळे झालं उघड

या जागतिक अभ्यासासाठी गेल्या तीन दशकांमध्ये 184 देशांमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक लोकांचं ब्लड प्रेशर मोजण्यात आलं. त्यावरुन असं लक्षात आलं की जवळजवळ अर्ध्या लोकांना हायपरटेन्शन बद्दल माहितीच नाही. 
तर अर्ध्याहून अधिक स्त्री-पुरुषांना माहिती असूनही त्यावर उपचार केले नाहीत.

या जागतिक अभ्यासासाठी गेल्या तीन दशकांमध्ये 184 देशांमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक लोकांचं ब्लड प्रेशर मोजण्यात आलं. त्यावरुन असं लक्षात आलं की जवळजवळ अर्ध्या लोकांना हायपरटेन्शन बद्दल माहितीच नाही. तर अर्ध्याहून अधिक स्त्री-पुरुषांना माहिती असूनही त्यावर उपचार केले नाहीत.

शरीरात बाहेरची गोष्ट गेली असेल, तर शरीर स्वीकारत नाहीच. ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संकेत देत राहतं. तसंच सूरज यांच्या बाबतीतही झालं. त्यांना थोड्याच दिवसांत फुप्फुसांशी संबंधित विकाराने घेरलं.

  कोची, 31 जुलै: कोणत्या गोष्टीचे परिणाम कधी भोगावे लागतील आणि एखादी लपून राहिलेली गोष्ट कधी उघड होईल, याबद्दल काही सांगता येत नाही. असंच काहीसं केरळमधल्या (Kerala) एका 32 वर्षांच्या व्यक्तीच्या बाबतीत घडलं. अलुवा (Aluwa) येथे राहणाऱ्या सूरज यांना अलीकडेच कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाला आणि त्यांना होत असलेला श्वास घेण्याचा त्रास, तसंच खोकला (Cough) कमीच होईना. त्या वेळी करण्यात आलेल्या तपासणीनंतर त्यांच्या आयुष्यात घडलेली 18 वर्षांपूर्वीची एक गोष्ट उघड झाली.

  18 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 साली सूरज नववीत शिकत होते. त्या वेळी पेनाच्या साह्याने शिटी वाजवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी चुकून पेनाची निब (Nib of Pen) गिळली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. तेथे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या एक्स-रे तपासणीत काहीही आढळलं नाही. म्हणजेच पेनाचं निब किंवा बाहेरची कोणतीही वस्तू फुप्फुसांमध्ये नाही, असा निष्कर्ष त्या एक्स-रेतून (X-Ray) काढण्यात आला होता. त्यामुळे सूरज यांचे कुटुंबीय निश्चिंत झाले. त्यांच्या शरीरात गेलेली निब पोटातून शौचाद्वारे बाहेर पडून गेली असावी, असंच सर्वांना वाटलं.

  हे वाचा-त्वचेवर ‘ही’ 3 लक्षणं दिसताच तपासा Blood Sugar; हालचाल करणंही होईल कठीण

  थोडे दिवस तसेच गेले; पण शरीरात बाहेरची गोष्ट गेली असेल, तर शरीर स्वीकारत नाहीच. ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संकेत देत राहतं. तसंच सूरज यांच्या बाबतीतही झालं. त्यांना थोड्याच दिवसांत फुप्फुसांशी संबंधित विकाराने घेरलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, तसंच खोकलाही त्यांची पाठ सोडेना. हे अस्थमा (Asthma) झाल्यामुळे होत असावं असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही वाटत होतं; त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत राहिले; पण तेवढ्यापुरतं बरं वाटलं तरी त्या त्रासापासून त्यांची सुटका काही होईना. न्यू इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

  अखेर त्यासाठी गेल्या वर्षीचा डिसेंबर महिना उजाडावा लागला. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोना संसर्गामुळे फुप्फुसांच्या (Lungs) कार्यक्षमतेवरच परिणाम होतो. आधीच फुप्फुसाशी संबंधित विकार असल्याने सूरज यांना त्याचा अधिकच त्रास झाला. त्यांची प्रकृती सुधारतच नव्हती. सतत येत असलेला खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना अखेर कोचीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

  हे वाचा-जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

  फुप्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात आहे, हे कळण्यासाठी छातीचा सीटी स्कॅन (Chest CT Scan) केला जातो. ते प्रमाण अभ्यासून नंतर कोरोनावरच्या उपचारांची दिशा ठरवता येते. त्यानुसार सूरज यांच्या छातीचाही सीटी स्कॅन करण्यात आला. त्यातून सूरज यांच्या फुप्फुसांत एक लोखंडी वस्तू असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि पुढच्या उपचारांसाठी त्यांना अमृता हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. हे समजल्यावर सूरज आणि त्यांच्या कुटुंबीयांना ती लोखंडी वस्तू म्हणजे 18 वर्षांपूर्वीची ती पेनाची निब असल्याचं लक्षात आलं.

  उजव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात हे निब अडकलेलं होतं. इतकी वर्षं हे निब तिथे असल्यामुळे त्यावर पेशींची वाढही झाली होती. ते काढून टाकण्याचं कठीण काम डॉक्टर्सनी केलं. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपी (Bronchoscopy) करून डॉक्टर्सनी ती निबही काढून टाकली. त्यानंतर एक दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आणि अखेर 29 जुलै रोजी ते घरी आले. तब्बल 18 वर्षांनी त्यांनी मोकळा श्वास घेतला. आता त्यांचा सगळा त्रास कमी होईल, अशी आशा त्यांना आहे. त्यांच्यासाठी कोरोना संसर्ग ही जणू इष्टापत्तीच ठरली.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Coronavirus, Health, Kerala, Lifestyle