Home /News /national /

लॉटरीची तिकीटं विकता विकता नशीब बदललं; एक निर्णय घेतला आणि झाला 12 कोटींचा मालक

लॉटरीची तिकीटं विकता विकता नशीब बदललं; एक निर्णय घेतला आणि झाला 12 कोटींचा मालक

नऊ वर्ष परदेशात राहिल्यानंतर 2013 मध्ये तो आपल्या देशात परतला. तेव्हापासून तो लॉटरी खरेदी-विक्रीचं काम करतो. हा व्यक्ती रातोरात करोडपती झाला आहे. एका लॉटरी तिकीटाने त्याचं नशीबच बदललं आहे.

    कोल्लम, 22 जानेवारी : आयुष्यात कधीतरी अशा काही घटना घटतात, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. 'उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है' हे अनेकदा ऐकलं आहे. पण अगदी असंच एका व्यक्तीसोबत नुकतंच झालंही आहे. त्यामुळे केरळमधील एक व्यक्ती रातोरात करोडपती झाला आहे. एका लॉटरी तिकीटाने त्या व्यक्तीचं नशीबच बदललं आहे. केरळमध्ये राहणारा शराफुद्दीन ए (Sharafudeen A) नावाचा व्यक्ती लॉटरीची तिकिटं विकण्याचं काम करतो. त्याची काही लॉटरीची तिकिटं विकली गेली नसल्याने तो चिंतेत होता, त्याने उरलेली तिकीटं स्वत:कडेच ठेवली होती. त्यापैकी एक तिकीट त्याने स्क्रॅच केलं आणि त्याच तिकिटाने त्याला, केरळ सरकारच्या ख्रिसमस न्यू ईयर बंपर लॉटरी (Christmas New Year Bumper Lottery) पुरस्कारमध्ये 12 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकून दिला. एका लॉटरीच्या तिकिटाने त्याचं आयुष्यचं बदललं आहे. मागील 7 वर्षांपासून लॉटरी खरेदी-विक्रीचं काम - केरळ सरकारच्या (Kerala government) ख्रिसमस न्यू ईयर बंपर लॉटरीच्या निकालांमध्ये विक्रेता शराफुद्दीन ए जवळ, विकल्या न गेलेल्या तिकिटांपैकी एक नंबर होता आणि त्याला 12 कोटींची लॉटरी लागली. आखाती देशांमधून काम करून आलेला 46 वर्षीय शराफुद्दीन येथे एका छोट्याशा घरात, सहा लोकांच्या कुटुंबासोबत राहतो. यापूर्वी तो रियादमध्ये छोटं-मोठं काम करायचा. नऊ वर्ष परदेशात राहिल्यानंतर 2013 मध्ये तो आपल्या देशात परतला. तेव्हापासून तो लॉटरी खरेदी-विक्रीचं काम करतो.

    (वाचा - ....म्हणून मुलाचं 'अजिंक्य' ठेवलं, रहाणेच्या बाबांनी सांगितलं कारण)

    Newsd ने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू राज्याच्या सीमेवर केरळच्या कोल्लम जिल्ह्यात (Kollam District) एरीवधर्मपुरममध्ये एका छोट्याशा घरात राहणारा शराफुद्दीन 2013 मध्ये आखाती देश रियादमधून परत आला होता. तेव्हापासून तो लॉटरी तिकिटाचं काम करतो. लॉटरी जिंकल्यानंतर शराफुद्दीनने PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, मला माझं घर बांधायचं आहे. लॉटरीतून जिंकलेल्या रकमेतून आधी संपूर्ण कर्ज फेडेन आणि एक छोटासा व्यवसाय सुरू करेन. आई, दोन भाऊ, पत्नी आणि 10वीत शिकणारा त्याचा मुलगा परवेज असं त्याचं कुटुंब आहे.

    (वाचा - 68 वर्षीय पुतिन यांची 37 वर्षांची गर्लफ्रेंड;सरकारी तिजोरीतून खर्चाचा होतोय आरोप)

    लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीला 30 टक्के टॅक्स आणि 10 टक्के एजेंट कमीशन कट केल्यानंतर बाकीची रक्कम दिली जाईल. 30 टक्के टॅक्स आणि 10 टक्के एजेंट कमीशननंतर शराफुद्दीनला जवळपास 7.50 कोटी रुपये मिळतील. केरळ सरकारच्या ख्रिसमस न्यू ईयर बंपर लॉटरी बीआर-77 चा निकाल 17 जानेवारी 2021 रोजी घोषित करण्यात आला. पहिलं बक्षिस 12 कोटी रुपये, दुसरं बक्षिस 50 लाख रुपये, तिसरं बक्षिस 10 लाख रुपये, चौथं बक्षिस पाच लाख रुपये आणि पाचवं बक्षिस एक लाख रुपयांचं होतं. पण कसंबसं आपलं घर चालवणाऱ्या शराफुद्दीनला पहिल्या बक्षिचाच नंबर लागला आणि त्याचं नशीबचं पालटलं.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या