Home /News /national /

500 रुपयाच्या नोटेने जादू केली, 12 कोटींची लॉटरी लागली, पेंटरच्या आयुष्याचं सोनं झालं

500 रुपयाच्या नोटेने जादू केली, 12 कोटींची लॉटरी लागली, पेंटरच्या आयुष्याचं सोनं झालं

सदानंदन ओलीपराम्बिल केरळ सरकारच्या 12 कोटींची लॉटरी (ख्रिसमस-न्यू इअर लॉटरी 2021-22) जिंकले आहेत. ही लॉटरी जिंकल्यामुळे ते देशभरात चर्चेत आले आहेत.

    त्रिवेंद्रम, 18 जानेवारी : नशिब कधी कुणाला कशी साथ देईल याचा काहीच भरोसा नाही. तसंच काहीसं केरळच्या कोट्टायम येथे राहणारे 77 वर्षीय सदानंदन ओलीपराम्बिल यांच्यासोबत घडलं आहे. सदानंदन रविवारी (16 जानेवारी) सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यांना खरंतर एका दुकानात जायचं होतं. पण त्या दुकानात जाण्याआधी त्यांच्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या नोटेचे त्यांना सुट्टे हवे होते. त्यासाठी त्यांना वाटेत एक लॉटरीच्या तिकीटांचं दुकान लागलं. खरंतर सदानंदन यांना लॉटरीचं तिकीट घेण्याची अतिशय जुनी सवय आहे. लॉटरी लागो न लागो, मनाच्या समाधानासाठी ते तिकीट कधीतरी खरेदी करतातच. त्यांनी 500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. त्यानंतर अवघ्या काही तासात सदानंदन यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. कारण तिकीट घेतल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना गुडन्यूज मिळाली की, ते जॅकपॉट विजेते ठरले आहेत. त्यांनी 12 कोटींची लॉटरी जिंकली आहे. सदानंदन ओलीपराम्बिल यांनी केरळ सरकारच्या 12 कोटींची लॉटरी (ख्रिसमस-न्यू इअर लॉटरी 2021-22) जिंकले आहेत. ही लॉटरी जिंकल्यामुळे ते देशभरात चर्चेत आले आहेत. खरंतर सुट्ट्यांसाठी घेतलेलं लॉटरीचं तिकीट आपल्याला एवढं मोठं गिफ्ट देऊन जाईल, असा सदानंदन यांनी कधीच विचार केला नव्हता. पण अखेर सदानंदन यांचं नशिब चमकलं आहे. लॉटरीचं तिकीट जेव्हा जाहीर झालं तेव्हा सदानंदन यांना आनंदाचा मोठा धक्काच बसला. आपला आनंद कसा व्यक्त करावं हे देखील त्यांना समजत नव्हतं. आपण खरंच करोडपती बनलोय या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. (Mumbai Dockyard : नौदलाच्या INS Ranvir जहाजावर स्फोट, तीन जवान शहीद) सदानंदन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक पेंटर आहेत. ते कुडेमपाडी येथे आपल्या पत्नी आणि मुलांसह राहतात. कोरोना संकट काळात त्यांच्यावर प्रचंड मोठं आर्थिक संकट कोसळलं. पण त्यांनी न झुकता संघर्ष केला. अखेर त्यांच्या या संघर्षापुढे नियतीलाही झुकावं लागलं. आता आपण एक छानसं घर बनवणार आणि मुलांचं भविष्यही उज्ज्वल करणार, असं सदानंदन यांनी लॉटरी लागल्यानंतर सांगितलं. तसेच लॉटरीतून जी रक्कम मिळेल त्या पैशांचा वापर नेमका कसा करायचा याबाबतचा निर्णय आपली दोन मुलं सनीश आणि संजय हे घेतील, असंही सदानंदन यांनी सांगितलं. (35 फूट खोल टाकीत पडला 10 वर्षांचा मुलगा, अग्निशमन दलाने बाहेर काढले पण...) दुसरीकडे सदानंदन यांना 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली असली तरी त्यांच्या हातात थेट तेवढीच रक्कम लागणार नाही. त्यातील काही रक्कम ही टॅक्स म्हणून कापली जाणार, तर काही रक्कम लॉटरी एजेंट कमीशन म्हणून कापले जाणार. त्यामुळे सर्व पैसे कापून सदानंदन यांच्या हातात जवळपास 7.39 कोटी रुपये मिळतील, अशी माहिती समोर आली आहे. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखापेक्षा जास्त तिकीट विकले आहेत. या तिकीटाची किंमत 300 रुपये इतकी होती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या