मराठी बातम्या /बातम्या /देश /

kerala election results 2021 : केरळमधून मोठी बातमी, LDF ने पार केला बहुमताचा आकडा!

kerala election results 2021 : केरळमधून मोठी बातमी, LDF ने पार केला बहुमताचा आकडा!केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

  • Published by:  sachin Salve
केरळ, 02 मे : केरळ विधानसभा निवडणुकीसाठी (kerala election results 2021) मतमोजणी सुरू झाली आहे. लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने (LDF) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने जोरदार टक्कर देत दुसऱ्या स्थानावर आहे. LDF ने आपला गड कायम राखत सत्तेकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे. बहुमताच्या आकड्यांपर्यंत LDF ने झेप घेतली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने इथं मोठी आघाडी घेत सत्तेकडे कूच केली आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा जवळपास गाठला आहे. आसाममध्ये काँग्रेस परतणार की कमळ पुन्हा फुलणार? भाजप आघाडीवर 70 जागांवर लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने आघाडी घेतली आहे. तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. या ठिकाणी भाजपला फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्षाला एक जागा मिळाली आहे. त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण विशेष म्हणजे, 140 जागांच्या केरळ विधानसभा कार्यकाळ 1 जून रोजी संपला आहे. राज्यात 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या युतीत लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने 91 जागांवर यश मिळवलं होतं. पिनराई विजयन राज्याचे 12 वे मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट दुसऱ्या नंबरवर होता. यंदा ही दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे.
First published:

Tags: Assembly Election 2021

पुढील बातम्या