तिरुवनंतपुरम, 22 डिसेंबर : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात आगडोंब उसळला आहे. उत्तर प्रदेशात 15 जिल्ह्यांमध्ये हिंसक घटना घडल्या. यामुळं 13हून अधिक लोकांना आपला जीवही गमवावा लागला. या सगळ्यात केरळमधील एक जोडप्यानं अगदी हटके पध्दतीनं या कायद्याला विरोध केला आहे.
संपूर्ण देशात विविध प्रकारे निदर्शनासाठी आणि समर्थनार्थ पोस्टर फिरवले जात आहेत. यात केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी असलेल्या एका जोडप्याने CAA आणि NRCला विरोध दर्शवण्यासाठी चक्क प्री-वेडिंग फोटोशूट केले. जीएल अरुण गोपी आणि आशा शेखर यांनी हातात No CAA आणि No NRC लिहिलेले फलक दिसत आहेत.
वाचा-नवीन वर्षात महागाईने कंबरडं मोडणार, रोजच्या वापरातील 'या' वस्तू महागणार!
आशा आणि अरुणचे 31 जानेवारी 2020 रोजी लग्न होणार आहे. फेसबुकवर प्री-वेडिंग फोटोशूटची छायाचित्रे फर्स्ट लूक फोटोग्राफी नावाच्या पेजने शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे- 'आम्ही एकत्र आहोत. म्हणून देशही एकत्र असावा.
वाचा-कर्जमाफी केली पण पैसा कुठून आणणार, रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
वाचा-दिल्लीतील सभेत PM मोदींचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
या फोटोशूटबाबत सोशल मीडियावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. काही लोकांना हे फोटोशूट आवडते आणि ते या जोडप्याला पाठिंबा देत आहेत. तर असेही काही लोक आहेत ज्यांनी या जोडप्याला पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
A pre wedding shoot Pic from Kerala.
Via : First Look photography#CAA_NRC_Protests pic.twitter.com/DxUwL2kX8b
— Advaid (@Advaidism) December 21, 2019
Kitna jhoot share karte ho...
The box with persecuted should have religion Hindu, Sikh, Christian, Buddhist. Why not change it and share it again.
— Nripendra (@Nripend33535049) December 21, 2019
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मदतीने पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि आसपासच्या देशांमध्ये धार्मिक छळामुळे पळून आलेल्या भारतीय, हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्धांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. या कायद्याच्या निषेधार्थ देशातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.