केरळमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 12 जणांना ‘कोरोना’ची लागण, देशातली संख्या 223वर

केरळमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 12 जणांना ‘कोरोना’ची लागण, देशातली संख्या 223वर

गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या 223 वर गेली आहे.

  • Share this:

कोची 20 मार्च : देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एर्नाकुलमध्ये 5, कारगौडमध्ये 6 तर पलक्कड जिल्ह्यात एकाचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या आता 223 वर गेली आहे.

बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कनिका ही काही दिवसांपूर्वीच लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत उपस्थित होती. त्या मेजवानीला राजकारण आणि इतर क्षेत्रातले 300 दिग्गज उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे याही उपस्थित होत्या. कनिका ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याने वसुंधराराजे यांनी मुलगा दुष्यंत यांच्यासह आपण क्वारंटाइन झाल्याचं जाहीर केलंय.

मुलगा दुष्यंत यांच्या सासुरवाडीच्या लोकांसोबत आपण लखनऊनला एका भोजन समारंभात उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला कनिका होती. ती पॉझिटिव्ह असल्याचं पुढे आल्याने मी आणि दुष्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असून डॉक्टर जे सांगत आहेत त्या सगळ्यांचं पालन करत असल्याचंही त्यांनी ट्विटरवर जाहीर केलं आहे.

जालन्यातील नागरिकांचा जीव भांड्यात, चीनमधून आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह

भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) झालेल्या एका इटालियन (Italian) पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झालेला नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

कोरोना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना VC मध्ये केली 'ही' विनंती

राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये (Jaipur) इटलीतील नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झाला, अशी बातमी देण्यात आली मात्र, हा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झालेला नाही, त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात समाविष्ट केलेला नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

 

 

 

First published: March 20, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या