राहुल गांधींनी रोड शो थांबून घेतला चहा आणि नाश्त्याचा स्वाद

राहुल गांधींनी रोड शो थांबून घेतला चहा आणि नाश्त्याचा स्वाद

राहुल गांधी यांनी आज आपल्या मतदारसंघात रोड शो करत मतदारांचे आभार मानले. तीन दिवस ते वायनाडमध्ये मुक्कामी आहेत.

  • Share this:

वायनाड 7 जून : काँग्रेसचे अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. तीन दिवस ते वायनाडमध्ये राहणार असून लोकांशी संवाद साधणार आहेत. आज रोड शो दरम्यान त्यांनी एका दुकानात जावून कार्यकर्त्यांसोबत चहा घेतला आणि संवाद साधला.

राहुल गांधी यांनी आज आपल्या मतदारसंघात रोड शो करत मतदारांचे आभार मानले. मल्लापूरम जिल्ह्यातल्या चोक्कड इथं रोड शो सुरू असताना मध्येच ते एका दुकानात गेले आणि चहा घेतला. काँग्रेसचे अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार अचानक दुकानात आल्याने दुकानदारही आश्चर्यचकीत झाला. राहुल यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकूल वासनिकही होते. कार्यकर्त्यांनीही राहुल यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

चहा आणि नाश्ता केल्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. मतदारांचे आभार मानण्यासाठी आपण वायनाडमध्ये जात असून तीन दिवसांमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याचं ट्विट राहुल यांनी बुधवारी केलं होतं. या तीन दिवसांमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांना भेटणं, जाहीर सभा असे वेगवेगळे 15 कार्यक्रम असल्याचं राहुल यांनी सांगितंलं होतं.

काँग्रेसच्या या नेत्याने केला पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा

लोकसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. पदासाठी योग्य पर्याय शोधा असं त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. आता मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी अध्यक्षपदावर दावा केलाय. राहुल गांधी यांची इच्छा नसेल आणि कुणी पुढे येत नसेल तर मी हे पद सांभाळायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तशा प्रकारचं पत्रही त्यांनी राहुल गांधी यांना पाठवलं आहे.

आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे शेरखान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. महिन्याभरात पर्याय शोधा असं त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं. सर्वच नेत्यांनी त्यांना पदावर राहण्याचा आग्रह धरला. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गांधी कुटुंबाशीवाय कुणी हे पद सांभाळण्यासाठी पुढं आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 06:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading