Home /News /national /

राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड! कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पाहा Video

राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड! कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पाहा Video

केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली (MP Rahul Gandhi's office in Wayanad vandalised) आहे.

    कोची, 24 जून : राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यासह देशात गोंधळ सुरू आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली (MP Rahul Gandhi's office in Wayanad vandalised) आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये आरोप केला आहे की "राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांनी SFI चे झेंडे हातात धरले होते". दरम्यान, SFI कडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. काय आहे घटना? वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याबद्दल काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, की आज दुपारी 3 च्या सुमारास, SFI कार्यकर्ते आणि नेत्यांच्या एका गटाने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयावर जबरदस्तीने अतिक्रमण केले. त्यांनी कार्यालयातील लोकांवर, राहुल गांधींच्या कर्मचाऱ्यांवर अमानुष हल्ला केला. आम्हाला या हल्ल्यामागील कारण माहित नाही. काँग्रेस नेते पुढे म्हणाले, "ते म्हणतात की ते बफर झोनच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. या प्रकरणी राहुल गांधींची भूमिका काय आहे हे मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, त्या मुद्द्यावर काही करता येत असेल तर ते केरळचे मुख्यमंत्री करू शकतात." राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करताना केसी वेणुगोपाल म्हणाले, "वायनाडमधील सामान्य लोकांना पाहून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे, पण तरीही SFI च्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या कार्यालयावर मोर्चा काढून कसा हल्ला केला, हे आम्हाला समजत नाही. दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून यावर अद्यापतरी प्रतिक्रिया आलेली नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या