Home /News /national /

Assembly Elections 2021: परकीय चलन तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा हात? सोने तस्कराचे गंभीर आरोप

Assembly Elections 2021: परकीय चलन तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा हात? सोने तस्कराचे गंभीर आरोप

Assembly Elections 2021: परकीय चलन तस्करीत (Foreign Currency Smuggling) राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन ( Pinarayi Vijayan) यांचा हात असल्याचा आरोप एका सोने तस्कराने केला आहे.

    तिरुवनंतपुरम, 05 मार्च: केरळमधील सोने तस्करीतील मुख्य आरोपी (Gold Smuggling Accused) स्वप्ना सुरेश याने केरळच्या मुख्यमंत्र्यांवर (Kerala CM) गंभीर आरोप केला आहे. परकीय चलन तस्करीत (Foreign Currency Smuggling) राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन ( Pinarayi Vijayan) यांचा हात असल्याचं म्हटलं आहे. ही माहिती कस्टम आयुक्त सुमित कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली आहे. यावेळी कुमार यांनी उच्च न्यायालयात निवेदनाद्वारे म्हटलं आहे की, सोने तस्कर आरोपी स्वप्ना सुरेशने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याशिवाय स्वप्ना यांनी केरळ विधानसभा अध्यक्ष आणि तीन कॅबिनेट मंत्र्यांवर परकीय चलन तस्करीचा आरोप लावला आहे. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हे आरोप केल्याने सत्ताधारी पक्षासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुख्यमंत्र्यांना पुरतं घेरलं आहे. सध्या केरळमध्ये गोल्ड रॅकेट प्रकरणाची चौकशी पाच केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या म्हणण्यानुसार, हा तपास राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे. सीएम विजयन यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या माजी मुख्य सचिवांशी निकटच्या संबंधाचा खुलासा कस्टम आयुक्तांनी असंही सांगितलं की, स्वप्ना सुरेशचे सीएम विजयन आणि त्यांचे माजी मुख्य सचिव यांच्याशी निकटचे संबंध आहेत. यापूर्वी केरळमधील विरोधी पक्ष यूडीएफनेही पिनारायी विजयन यांच्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जानेवारीत सभागृहात यूडीएफने म्हटलं होतं की, सोन्याच्या तस्करीसारख्या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडणं, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. हे ही वाचा-Assembly elections 2021: बंगालचा किल्ला कोण जिंकणार? जुलै महिन्यात 30 किलो सोनं जप्त केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात गेल्या वर्षी जुलै महिन्यात कस्टम अधिकार्‍यांनी विमानतळावरून 30 किलो सोनं जप्त केलं होतं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या सोन्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी आहे. यानंतर मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने पोलीस चौकशीत अनेक गंभीर खुलासे केले आहेत. या प्रकरणात राज्यातील अनेक राजकीय व्यक्तींची नावं समोर आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नावाचा खुलासाही झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Assembly Election 2021, Kerala

    पुढील बातम्या