विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के, 54 वर्षांचा बालेकिल्ला गमावला

विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के, 54 वर्षांचा बालेकिल्ला गमावला

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनेक बालेकिल्ले गमवावे लागले होते. आता विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला धक्का बसला आहे.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 27 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनेक बालेकिल्ले गमवावे लागले होते. आता विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला धक्का बसला आहे.केरळमधल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला हिरावून घेण्यात आला. पला विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि LDFचे उमेदवार विजयी झाले.

पला मतदारसंघात गेली 54 वर्षं काँग्रेसची सत्ता होती. आता मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला LDF म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने जिंकला. या मतदारसंघातले मतदार केरळ काँग्रेसचे प्रमुख असलेले दिवंगत नेते के. एम. मणि यांच्या पाठिशी होते. इथे 72 टक्के मतदान झालं होतं. या मतदारसंघात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे.

काँग्रेसची पकड ढिली

LDF चे उमेदवार मणि सी. कप्पन यांनी यूडीएफचे एस. जोस टॉम यांचा 2 हजार 943 मतांनी पराभव केला. पला मतदारसंघात झालेल्या या पराभवामुळे काँग्रेसची या राज्यावरची पकड ढिली झाली आहे.

केरळ काँग्रेस (M)चे दिवंगत नेते के. एम. मणि हे पला मतदारसंघातून सगळ्यात जास्त काळ आमदार होते. त्यांची ही परंपरा काँग्रेस उमेदवारांना टिकवता आली नाही.

(हेही वाचा : शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केरळमध्ये चांगलं यश मिळालं होतं. अमेठीमध्ये पराभव झाला असला तरी काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून निवडून आले. त्याचबरोबर काँग्रेसला इथे 15 जागा मिळाल्या होत्या पण विधानसभा पोटनिवडणुकीत या पक्षाला धक्का बसला.

===============================================================================================

मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

Published by: Arti Kulkarni
First published: September 27, 2019, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading