अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर गांधी हत्येचा फोटो, केरळ सरकारच्या कृतीनं राजकीय गदारोळ

अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर गांधी हत्येचा फोटो, केरळ सरकारच्या कृतीनं राजकीय गदारोळ

देशात महात्मा गांधींची हत्या साजरी केली जात असेल तर हे गरजेचं आहे असं वक्तव्य सीपीएमचे नेते एमबी राजेश यांनी केलं.

  • Share this:

तिरवनंतपुरम,07 फेब्रुवारी: केरळ सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून प्रचंड गदारोळ माजलाय. सरकारनं अर्थसंकल्पाच्या कव्हरवर राष्ट्रपीता महात्मा गांधींच्या हत्येचं पेंटिंग छापलं आहे. पेटिंग छापल्यावरून वाद निर्माण झाला असला तरी सीपीएमनं त्याचं समर्थन केलंय. देशात महात्मा गांधींची हत्या साजरी केली जात असेल तर हे गरजेचं आहे असं वक्तव्य सीपीएमचे नेते एमबी राजेश यांनी केलं. आम्ही या पेंटिंगच्या माध्यमातून देशाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महात्मा गांधींनी देशासाठी किती मोठा त्याग केला आहे.

भाजपनं मात्र सरकारच्या या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवलाय. महात्मा गांधींच्या हत्येचा जल्लोष करणारे ते लोक कोण आहेत? सरकारचा या मागचा खरा हेतू काय? महात्मा गांधींच्या हत्येचा फोटो अर्थसंकल्पाच्या कव्हरवर छापून सरकार आपलं अपयश झाकू पाहातंय. आपल्या चुकीच्य कामांना लपवू पाहात असल्याची टीका भाजपचे नेते टॉम वड्डक्कन यांनी केली. शिवाय केरळ सरकार सर्वसामान्य लोकांच्या मूळ प्रश्नावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हत्यांचं सरकारकडे काहीही उत्तर नाही. त्यामुळे अशा गोष्टी करून सरकार लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय. पण काहीही झालं तरी केरळच्या जनतेला उत्तर द्यावंच लागेल असा इशाराही डॉम वड्डक्कन यांनी दिला आहे.

‘भाजपला आपला इतिहास माहीत आहे’

डॉम वड़्डक्कन याच्या आरोपांना राजेश यांनी प्रतिउत्तर दिलंय. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या वडड्क्कन यांना एकच सांगायचं की सरकारला काहीही लपवायचं नाही. उलट केरळचा विकासदर हा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. उलट केंद्रातलं भाजप सरकारच अनेक गोष्टी लपवत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनीच नॉमिनल जीडीपीचा उल्लेख केला आहे. शिवाय भाजपला आपला इतिहास माहीत आहे त्यामुळे अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर गांधी हत्येचा फोटो छापल्यानं त्यांना वाईट वाटतंय असा टोलाही राजेश यांनी भाजपला लगावला.

First published: February 7, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading