मराठी बातम्या /बातम्या /देश /

32 वर्ष जुन्या 'अंडरवियर'ने वाढवलं मंत्र्याचं टेन्शन! विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी

32 वर्ष जुन्या 'अंडरवियर'ने वाढवलं मंत्र्याचं टेन्शन! विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी

Kerala Minister Antony Raju ड्रग्ज तस्करी प्रकरणातल्या एका निळ्या रंगाच्या अंडरवियरमुळे केरळचे परिवहन मंत्री एंटनी राजू (Antony Raju) यांना 32 वर्षांनी पुन्हा अडचणीत आणलं आहे.

  • Published by:  Shreyas
तिरुवनंतपुरम, 18 ऑगस्ट : ड्रग्ज तस्करी प्रकरणातल्या एका निळ्या रंगाच्या अंडरवियरमुळे केरळचे परिवहन मंत्री एंटनी राजू (Antony Raju) यांना 32 वर्षांनी पुन्हा अडचणीत आणलं आहे. या प्रकरणामध्ये एंटनी राजू आरोपीचे वकील होते. जनाधिपती केरळ काँग्रेसचे नेते आणि केरळच्या सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचे सहयोगी एंटनी राजू तिरुवनंतपुरम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ड्रग्ज पेडलिंगचं हे प्रकरण 1990 सालचं आहे. तिरुवनंतपुरम विमानतळावर एंड्र्यू सल्वाटोर सेरवेली या ऑस्ट्रेलियन नागरिकाला त्याच्या अंडरवियरमध्ये चरस लपवल्यामुळे पकडण्यात आलं होतं. एंटनी राजू त्यावेळी तिरुवनंतपुरममध्ये वकील म्हणून व्यवसाय करत होते. ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या सेरवेली याचं वकिलपत्र राजू यांनी घेतलं होतं. ड्रग्ज पेडलिंगच्या या प्रकरणात आरोपी असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला सोडून देण्यात आलं. पुरावा म्हणून दाखवण्यात आलेली अंडरवियर छोट्या आकाराची होती तसंच आरोपीला फिट होत नव्हती, असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. ड्रग्ज पेडलिंगचं प्रकरणातले तपास अधिकारी जयमोहन यांनी पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेतली. यानंतर तिरुवनंतपुरममध्ये वंचियूर पोलिसांनी 1994 साली गुन्हा दाखल केला. एंटनी राजू यांच्याशी मिलीभगत करून कोर्टाच्या कारकुनाने पुराव्याशी छेडछाड केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या दोघांवर कट रचणे, पुराव्याशी छेडछाड करणे, फसवणुकीचे आरोप झाले. तपास यंत्रणांनी एंटनी राजू यांच्याविरुद्ध चार्जशीटही दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी 2006 साली हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीट नुसार राजू यांनी कोर्टातून सामान ज्यात निळ्या रंगाच्या अंडरवियरचा समावेश आहे, ते एकत्र केलं आणि मग त्याचा आकार बदलून पुन्हा परत केलं. एका क्लार्क इनचार्जने लाच घेऊन कोर्ट रूममधून अंडरवियर राजू यांना दिली. एंटनी राजू यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे त्यांनी मंत्रीपदी राहू नये. मंत्र्यावर पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप आहे, अशी व्यक्ती मंत्रिमंडळात कशी राहू शकते? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते वीडी सतीसन यांनी केली. तर दुसरीकडे भाजपनेही राजू यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. एंटनी राजू यांनी मात्र आपण याप्रकरणी जामिनावर बाहेर आहोत आणि विधानसभा निवडणूक लढवताना आपण या केसबाबत काहीही लपवलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
First published:

पुढील बातम्या