खळबळजनक! भावानेच घेतला लाडक्या बहिणीचा जीव, आइसक्रिममध्ये विष टाकून केली हत्या

खळबळजनक! भावानेच घेतला लाडक्या बहिणीचा जीव, आइसक्रिममध्ये विष टाकून केली हत्या

एका भावानेच आपल्या 16 वर्षीय बहिणीची हत्या केली. मुख्य म्हणजे आरोपीनं बहिणीला विष असलेलं आइसक्रिम खाऊ दिलं.

  • Share this:

कासारगोड, 14 ऑगस्ट : केरळमधील कासारगोडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका भावानेच आपल्या 16 वर्षीय बहिणीची हत्या केली. मुख्य म्हणजे आरोपीनं बहिणीला विष असलेलं आइसक्रिम खाऊ दिलं. या प्रकरणी 22 वर्षीय अलबीनला अटक करण्यात आली आहे. अलबीननं याआधीही जेवणात विष टाकले होते, त्यानंतर त्याने आइसक्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या करण्याचा प्लॅन रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलबीननं आइसक्रिममध्ये विष केवळ बहिणीला मारण्यासाठी टाकले होते. मात्र 16 वर्षीय मृत अॅनासोबतच तिच्या वडीलांनीही हे विष असलेले आइसक्रिम खाल्ले. त्यामुळे काही वेळानं दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की ही घटना 3 ऑगस्ट रोजी घडली. मात्र अॅनाच्या शरीरात जास्त विष गेल्यामुळे 6 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

वाचा-भरधाव ट्रकनं दोन कारना उडवलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

पोलिसांनी अलबीनला अटक केल्यानंतर, त्यानं सांगितले की त्याचा प्लॅन केवळ अॅनाला मारण्याचा होता. दरम्यान, केवळ अॅना आणि बेन्नी यांनी आइसक्रिम खाल्ले. तर, अलबीन आणि त्याच्या आईने खाल्ले नाही. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची ज़डती घेतली तेव्हा त्यांना आइसक्रिममध्ये उंदिरांना मारण्याचे औषध आढळले.

वाचा-धक्कादायक! PUBG च्या नादात खाणंपिणंही सोडलं; 16 वर्षीय मुलाने गमावला जीव

अलबीनने याआधी जेवणात विष टाकून घरच्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने आइसक्रिममध्ये विष टाकले. अलबीनने फ्रिजमध्ये दोन भांड्यात आइसक्रिम ठेवले होते, त्यातील एकात त्यानं विष टाकले होते. ते आइसक्रिम त्याने अॅनाला खाऊ घातले. तर, अलबीननं विष नसलेले आइसक्रिम खाल्ले. अलबीननं 29 जुलैला विष खरेदी केले होते. पोलिसांना अॅनाच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्येही तिच्या शरीरात विष असल्याचे आढळून आले.

वाचा-पतीला मारली गोळी, पत्नीचं धड केलं वेगळं; तब्बल 41 मिनिटं घरात सुरू होता थरार

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अॅलबीनला हळूहळू संपूर्ण कुटुंबाला मारायचे होते. कारण त्याला घरात एकटे राहायचे होते. पोलिसांनी अशी शंका व्यक्त केली आहे की अलबीनला माणसिक तणाव असू शकतो, सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 14, 2020, 9:40 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या