Home /News /national /

केम छो ट्रम्प? 'हाउडी मोदी' नंतर ट्रम्प आणि मोदी पुन्हा येणार एका मंचावर

केम छो ट्रम्प? 'हाउडी मोदी' नंतर ट्रम्प आणि मोदी पुन्हा येणार एका मंचावर

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि या कार्यक्रमाला सध्या 'केम छो ट्रम्प' असं गुजराती नाव देण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात टेक्सासमध्ये 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. टेक्सासमधल्या ह्यूस्टनमध्ये नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प एकाच मंचावर आले. या कार्यक्रमासाठी सुमारे 50 हजार लोक उपस्थित होते. आता भारतातही असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात डॉनल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि या कार्यक्रमाला सध्या केम छो ट्रम्प असं गुजराती नाव देण्यात आलं आहे. ट्रम्प तुम्ही कसे आहात? असाच याचा अर्थ होतो. ट्रम्प यांची मागणी हा कार्यक्रम अहमदाबादमध्ये होणार आहे पण न्यूज़18 च्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेला हा कार्यक्रम दिल्ली - NCR मध्ये हवा आहे. भारत दौऱ्यावर येणारे ट्रम्प दिल्लीच्या बाहेर जाऊ इच्छित नाहीत. त्यांच्याकडे खूपच कमी वेळ आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कुठे होईल ते पाहावं लागेल. भारताला मात्र हा कार्यक्रम दिल्ली-NCR मध्ये नको आहे. ह्यूस्टनसारख्याच गर्दीचं व्यवस्थापन करायचं असेल तर अहमदाबाद जास्त सोपं राहील. त्याचबरोबर सध्या CAA विरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अहमदाबादमध्ये झाला तर बरं होईल, असं भारताला वाटतं. (हेही वाचा : PMC नंतर ही बँक बुडण्याचा धोका, खातेदारांचा जीव टांगणीला) मोटेरा स्टेडियममध्ये कार्यक्रम? सध्या या कार्यक्रमासाठी ठिकाण ठरवण्यात आलेलं नाही. पण अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो. इथे सुमारे 1 लाख 10 हजार लोक बसू शकतात. ट्रम्प यांचा भारत दौरा 24 ते 26 फेब्रुवारीमध्ये होई शकतो. त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प याही त्यांच्यासोबत ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला जाऊ शकतात.अमेरिकेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा या निवडणुकांच्या प्रचाराचाच एक भाग असू शकतो. ====================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Narendra modi, Trump

    पुढील बातम्या