केजरीवालांची कन्याही राजकीय मैदानात, एका प्रश्नाने केली सर्व विरोधकांची बोलती बंद

केजरीवालांची कन्याही राजकीय मैदानात, एका प्रश्नाने केली सर्व विरोधकांची बोलती बंद

काही जणांनी केजरावालांना दहशतवादी म्हटले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान (Delhi Assembly Election 2020) राजकीय पक्षांमध्ये तू तू मैं मैं सुरू आहे. सध्या सर्व पक्षांना दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. दिल्लीतून आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल पुन्हा बाजी मारहाण असे सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सध्य़ा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची कन्या हर्षिता केजरीवाल (Harshita Kejriwal) तिच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एएनआयने सांगितल्यानुसार हर्षिता म्हणाली, की राजकारण चुकीचे आहे. मात्र याचा स्तर खाली जात आहे. हर्षिताने आपल्या वडिलांना दहशतवादी म्हटल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. जर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळवून देत असेल तर तो दहशतवाद असेल आहे? जर मुलांना चांगले शिक्षण पुरविले जात असेल तर तो दहशतवाद आहे? जर वीज आणि पाण्याची सोयी सुविधा वेळेत पुरविली जात असेल तर तो दहशतवाद असेल का? असे प्रश्न हर्षिताने उपस्थित केले आहे.

हर्षिता म्हणाली, की माझे वडील सामाजिक काम करीत आले आहेत. मला आठवतंय माझे वड़ील दररोज सकाळी 6 वाजता उठवून आमच्या कुटुंबाला भगवत गीताचे पाठ वाचवून दाखवित. याशिवाय आम्ही ‘इंसान का इंसान से हो भाईचारा’ हे गाणंदेखील म्हणायचो. भगवत् गीताची आम्हाला शिक्षा मिळायची. हा दहशतवाद कसा असेल? असा प्रश्न तिने उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2020 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading