केजरीवालांची 'व्हॅगनॉर' कार दिल्ली सचिवालयासमोरून चोरीला गेली !

केजरीवालांची 'व्हॅगनॉर' कार दिल्ली सचिवालयासमोरून चोरीला गेली !

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीमानाची ओळख बनलेली व्हगनॉर कार चोरीला गेली आहे. निळ्या रंगाची ही व्हॅगन-आर कार चक्क दिल्ली सचिवालयासमोरुन चोरीला गेली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीमानाची ओळख बनलेली व्हॅगनॉर कार चोरीला गेली आहे. निळ्या रंगाची ही व्हॅगन-आर कार चक्क दिल्ली सचिवालयासमोरुन चोरीला गेली आहे. 'आप'च्या कार्यकर्त्या वंदना सध्या ही कार वापरत होत्या. केजरीवाल यांनी 'आप' पार्टीची स्थापना केल्यानंतर एका एनआरआयकडून त्यांना ही कार भेट म्हणून मिळाली होती. दिल्ली पोलीस या कार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताहेत. पण दिल्ली पोलीस ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने केजरीवाल समर्थकांनी या कार चोरीच्या घटनेवरून मोदी सरकारला लक्ष्यं केलंय.

 

2014 मध्ये दिल्ली पोलिसांविरोधात केलेल्या आंदोलनात केजरीवालांनी या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळीही केजरीवालांनी हीच कार वापरली होती. थेट मुख्यमंत्र्यांचीच कार चोरीला गेल्यानं ती पुन्हा सापडून देणं हे दिल्ली पोलिसांसमोरचं खडतर आव्हान असणार आहे. नाहीतर 'आप'चे कार्यकर्ते पुन्हा दिल्ली पोलिसांवर सापत्नभावाचा आरोप दिल्ली पोलिसांवर करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 09:03 PM IST

ताज्या बातम्या