मराठी बातम्या /बातम्या /देश /

केदारनाथ प्रलय : सहा वर्षे ती जगत होती विधवेचं आयुष्य, अचानक आला पतीचा VIDEO CALL

केदारनाथ प्रलय : सहा वर्षे ती जगत होती विधवेचं आयुष्य, अचानक आला पतीचा VIDEO CALL

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 2013 ला झालेल्या जलप्रलयात तीचा पती बेपत्ता झाला होता. त्यानंतर पतीच्या परतण्याची आशा सोडलेली ती विधवेचं आयुष्य जगत होती.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 2013 ला झालेल्या जलप्रलयात तीचा पती बेपत्ता झाला होता. त्यानंतर पतीच्या परतण्याची आशा सोडलेली ती विधवेचं आयुष्य जगत होती.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 2013 ला झालेल्या जलप्रलयात तीचा पती बेपत्ता झाला होता. त्यानंतर पतीच्या परतण्याची आशा सोडलेली ती विधवेचं आयुष्य जगत होती.

  • Published by:  Suraj Yadav

डेहराडून, 03 डिसेंबर : उत्तराखंडमध्ये सहा वर्षांपूर्वी 2013 मध्ये महाप्रलय आला होता. त्यावेळी वित्त हानीसोबतच जिवीत हानीही मोठ्या प्रमाणावर झाली होती. यात अनेकजण मृत्यूमुखी पडले होते तर कित्येकजण बेपत्ता होते. आता सहा वर्षांनी एका व्यक्तीचा शोध लागला असून त्याला कुटुंबीयांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. जेव्हा ते घरी गेले तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती वेगळीच होती. त्यांची पत्नी गेल्या सहा वर्षांपासून एक विधवेचं आयुष्य जगत होती.

उत्तराखंडमधील उधमसिंग नगर जिल्ह्यातील सितारगंज इथले जमील अहमद अन्सारी 2013 च्या जलप्रलयामध्ये बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांची पत्नी मोबिन अन्सारी एका विधवेसारखं आयुष्य जगत होत्या. पती जमील आता कधीच परतणार नाहीत अशीच त्यांनी मनाची समजूत घातली होती. मात्र, 31 डिसेंबर 2019 ला मोबिन यांना एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यांचे भानच हरपले. मोबिन यांना त्यांचे पती जमील यांचा कॉल आला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांनी ऑपरेशन स्माइल अंतर्गत जमील यांना शोधलं होतं. जलप्रलयानंतर त्यांच्या स्मृती गेल्या होत्या. ते चमोलीती गोपेश्वर इथं एका शेल्टर होममध्ये राहत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करून त्यांना शोधलं. शेवटी 1 जानेवारीला ते कुटुंबात परतले.

चमोली जिल्ह्यात ऑपरेशन स्माइल राबवणाऱे पोलिस उपनिरीक्षक नितीन बिश्त यांनी सांगितलं की, 2013 मध्ये जमील लंबागड इथं मोलमजुरी करायचे. ज्यावेळी केदारनाथचा प्रलय झाला तेव्हा अलकनंदात वाहून गेले. त्यानंतर पुढे काय झालं हे त्यांना आठवत नाही. जमील यांच्याशी 2016 मध्ये पोलिसांनी बोलणं केलं होतं.

जमील यांनी पोलिसांना सुरुवातीला स्वत:चे नाव जहीर खान असं सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये त्यांची भेट घेतली तेव्हा जमील असं नाव सांगितलं. यानंतर त्यांच्या फोटोला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं. जमील यांच्या भाच्याने त्यांना ओळखलं तेव्हा तिथून त्यांच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. अखेर 1 जानेवारीला पोलिसांनी त्यांना कुटुंबियांपर्यंत पोहचवलं.

वाचा : अनुराधा पौडवाल माझी आई, केरळच्या महिलेचा दावा; कोर्टात दाखल केला 50 कोटींचा दावा

First published:

Tags: Uttarakhand