KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची अशी झाली अवस्था

KBC: 5 कोटी जिंकूनही सांभाळू शकला नाही 'लक्ष्मी'; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची अशी झाली अवस्था

अभिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये सुशीलने तब्बल 5 कोटी रुपये जिंकले. 5 कोटींच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देणारा सुशील पहिला स्पर्धक होता

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : कौन बनेगा करोडपती (KBC) सीजन 5 मध्ये 5 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन इतिहास रचणारे सुशील कुमार गेल्या अनेक दिवसांत चर्चेत नाहीत. सुशील 5 कोटींच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देणारे पहिले स्पर्धक होते. मात्र तुम्हाला माहीत आहे सध्या ते काय करतात?

आयएएसची (IAS) तयारी करणारे सुशील कुमार यांनी 5 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं आणि ते करोडपती झाले. मात्र इतकी मोठी रक्कम ते सांभाळू शकले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सुशील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. इतका पैसा आल्यानंतर ते दारू आणि सिगारेटच्या व्यसनाधीन झाले. यानंतर अनेकांनी त्यांना फसवलं.

सुशील कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, करोडपतीमधील विजयनंतर सेलिब्रिटी झाल्यामुळे दर पंधरा दिवसांनी बिहारमध्ये कुठे ना कुठे कार्यक्रमासाठी आमंत्रण असायचं. त्यामुळे अभ्यासही मागे पडला. त्यावेळी मीडियाला खूप गांभीर्याने घेत होतो. आणि त्यावेळी माध्यमांकडून मला वारंवार काय करत आहात, असा प्रश्न विचारला जायचा. यावेळी मी या ना त्या व्यवसायात कोणत्याही अनुभवाशिवाय पैसे गुंतवत होतो. त्यांना मी बेकार आहे, हा यामागील अट्टाहास होता. सुशील पुढे म्हणाले की, याचा परिणाम म्हणजे काही दिवसात व्यवसाय तोट्यात जात होता. यासोबत केबीसीनंतर मी दानशूर झालो होतो आणि गुप्त दान करीत होतो. महिन्यात साधारण 50000 रुपये अशा कामात खर्च होत होते. अशामुळे काही मवाली लोक त्यांच्या संपर्कात आले. यामध्ये अनेकांनी मला खूप फसवलं, ही बाब मला दान केल्यानंतर समजली.

हे ही वाचा-Online Class साठी घेतला नवीन मोबाइल; महिनाभरात स्वत:ला पेटवून घेण्याची आली वेळ

यामुळे पत्नीसोबतचे संबंध हळूहळू बिघलू लागले. ती नेहमी म्हणायची तुम्हाला चांगल्या आणि वाईट लोकांना ओळखता येत नाही आणि भविष्याची चिंता नाही. हे एकून पत्नी मला समजू शकत नसल्याची वाटत होते. यामुळे आमच्या दोघांमध्ये खूप वाद व्हायचा. सुशील पुढे म्हणाले की, यादिवसात दारू आणि सिगारेटचं व्यसन लागलं होतं. यासारख्या अनेक गोष्टींबाबत सुशील कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये खुलासा केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 14, 2020, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या