कटिहार, 26 जुलै: चॉकलेट कुणाला आवडत नाही? चॉकलेट म्हटलं की अगदी लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यासाठी ते वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतात. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालून जोखमी पत्करतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीथे एका चॉकलेटसाठी लहान मुलांना मोठी जोखीम पत्करावी लागते.
हसनगंज हे गाव पूरग्रस्तांचं गाव म्हणून ओळखलं जातं इथे मुसधार पाऊस झाला की कायम नदीला मोठा पूर येतो अशावेळी गावातील नागरिकांना काही कामासाठी अथवा गॅस सिलेंडर आणण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर नदी आणि पुराचा सामना करून जावं लागतं किंवा बोटीनं नदी पार करावी लागते.
या गावातील नागरिक बोटीचे पैसे वाचवण्यासाठी मुलांना सिलेंडर घेऊन नदी पार करण्यासाठी सांगतात. या बदल्यात इथल्या मुलांना चॉकलेटचं आमिष दिलं जातं. ऊन असो की पाऊस या मुलांचा हा चॉकलेटासाठी नदी पार करून जावी लागते. या मुलांना आपल्यासोबत सिलेंडर घेऊन जावं लागत आहे.
हे वाचा-सावध राहा, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही! PM मोदींनी जनतेला केलं आवाहन
नदी ओलांडून गॅस सिलिंडर आणणारी मुलं अरबाज आणि अशफाक सांगतात की, सिलिंडरने नदी ओलांडण्यासाठी कोणत्याही सशर्त पैशाची मागणी केली जात नाही, परंतु ते प्रति सिलिंडरला दोन ते तीन चॉकलेट देतात. या चॉकलेटासाठी मुलं आपला जीव मात्र धोक्यात घालतात. ही घटना बिहारच्या कटिहार परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.
या नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला तर मुलांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. याची कल्पना असतानाही गावातील नागरिक या मुलांना सामना किंवा सिलेंडर आणण्यासाठी केवळ ग्रामस्थांचे पैसे वाचावेत म्हणून या मुलांना नदी पार करायला लावतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms