कठुआ प्रकरणी नराधमांना फाशी नाही, तिघांना जन्मठेप तर एकाची सुटका

Kathua Rape Case : देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी 3 जणांना पठाणकोट न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी एकाची सुटका झाली तर दोन पोलिसांना पाच - पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 04:57 PM IST

कठुआ प्रकरणी नराधमांना फाशी नाही, तिघांना जन्मठेप तर एकाची सुटका

पठाणकोट, 10 जून : देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींपैकी 3 जणांना पठाणकोट न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी एकाची सुटका झाली तर दोन पोलिसांना पाच - पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.

2018मध्ये जम्मूमध्ये झालेल्या कठुआ बलात्कार प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. 2018मध्ये जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील 8 वर्षाच्या मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता. 3 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. सांझी राम हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

काय आहे प्रकरण

2018मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यास भडकवल होतं. अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात.

'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे'. असं कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले होतं.

Loading...

फाशीची मागणी

कठुआ प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. त्यानंतर साऱ्या देशात मोर्चे काढत आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली होती. UNनं देखील कठुआच्या प्रकरणाची दखल घेत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.

================================================================================================================

औरंगाबादमध्ये पराभवानंतर 'वंचित'ला टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा 'गेमप्लॅन'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...