कठुआ, 10 जून : जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथे 2018मध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला. आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. आरोपी नराधमांमध्ये स्पशेल पोलीस ऑफिसर दिपक खजुरीया, पोलीस ऑफिसर सुरेंद्र कुमार, परवेश कुमार, असिस्टंट सब इन्सपेक्टर आनंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज, माजी अधिकाऱ्याचा मुलगा विशाल आणि त्याचा चुलत भाऊ ( अल्पवयीन ) यांचा सहभाग आहे. शिवाय, सांझी राम हा मुख्य आरोपी आहे.
सांझी राम ( 60 वर्षे )
सांझी राम हा या घटनेचा मास्टरमाईंड आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सांझी रामनं बकरवाल समाजातील 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि खूनाचा प्लॅन केला. सांझी रामनं रासना गाव मंदिरातील सेवकाला हटवण्यासाठी साऱ्या गोष्टीचा प्लॅन रचला होता. त्यासाठी त्यानं आपल्या सोबतच्या लोकांची माथी भडकवायला सुरूवात केली होती.
सांझी रामचा भाचा ( 15 वर्षे )
सांझी रामनं आपल्या भाच्याला अपहरण आणि बलात्कारासाठी उसकवलं होतं. बकरवाल समाजाशी बदला घेण्यासाठी असं कृत्य करण्यात आलं. भाचानं सर्वप्रथम मुलीचा गळा दाबला त्यानंतर दगडानं तिची हत्या केल्याचा आरोप सांझी रामच्या भाच्यावर आहे.
दिपक खजुरीया, पोलीस ऑफिसर
मुलीला मारण्यापूर्वी दिपकनं बलात्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. सांझी रामनं आपल्या कबुली जवाबामध्ये दिपक खजुरीयाचं नाव घेतलं. प्रकरणाची चौकशी करताना दिपकचं मोबाईल लोकेशन मुलीला कोंडण्यात आलेल्या खोलीच्या ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं.
सुरेंद्र कुमार, पोलीस ऑफिसर
सुरेंद्र कुमारचं मोबाईल लोकेशन देखील मुलीला कोंडण्यात आलेल्या खोलीच्या ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं होतं.
विशाल जंगोत्रा
विशाल जंगोत्रा हा सांझी रामचा मुलगा आहे. मेरठमध्ये त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. विशालवर मुलीवर बलात्काराचा आरोप आहे.
परवेश कुमार
परवेश कुमार हा सांझी रामच्या अल्पवयीन भाच्याचा मित्र आहे. अपहरण केल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे.
उप निरीक्षक आनंद दत्ता आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज
उप निरीक्षक आनंद दत्ता आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राजवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. अटकेपासून वाचण्यासाठी या दोघांनी मिळून मुलीचे कपडे धुतले होते.
VIDEO : अतिउत्साह नडला, मुंबईच्या समुद्रकिनारी अडकली कार