'कठुआ बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी का नाही?'

'कठुआ बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा होणं अपेक्षित होतं. पण 6 पैकी 3 आरोपींना जन्मठेप झाली. या शिक्षेच्या विरोधात जम्मू काश्मीर सरकारने वरच्या कोर्टात दाद मागितली पाहिजे', असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 06:13 PM IST

'कठुआ बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी का नाही?'

नवी दिल्ली, 10 जून : 'कठुआ बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा होणं अपेक्षित होतं. पण 6 पैकी 3 आरोपींना जन्मठेप झाली. या शिक्षेच्या विरोधात जम्मू काश्मीर सरकारने वरच्या कोर्टात दाद मागितली पाहिजे', असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे.



Loading...

2018मध्ये जम्मूमध्ये झालेल्या कठुआ बलात्कार प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. जम्मू – काश्मीरमधल्या कठुआमध्ये बकरवाल समाजातल्या 8 वर्षाच्या मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता. 3 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. सांझी राम हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

काय होतं प्रकरण ?

2018मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यासाठी भडकवलं होतं. अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाजातले लोक प्रामुख्याने गुराख्याचं काम करतात.

'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदूंना भडकावत असे'. असं कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं होतं.

फाशीची मागणी

कठुआ प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. त्यानंतर साऱ्या देशात मोर्चे काढत आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली होती. UNनं देखील कठुआच्या प्रकरणाची दखल घेत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.

============================================================================================

क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...