कठुआ प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेर घ्या, पीडित कुटुंबाची मागणी

कठुआ प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेर घ्या, पीडित कुटुंबाची मागणी

कठुआमध्ये आरोपींकडून तपास यंत्रणेवर दबाव येऊ शकतो, प्रत्यक्षदर्शींना धमकावलं जाऊ शकतं. त्यामुळे तठस्थ ठिकाणी खटला चालवला जावा, अशी त्यांची मागणी आहे

  • Share this:

जम्मू काश्मीर, 16 एप्रिल : आपल्यावर दबाव असून योग्य न्याय मिळण्यासाठी आपल्या प्रकरणाची सुनावणी जम्मू काश्मिरच्या बाहेर करावी अशी मागणी कठुआ प्रकरणातल्या पीडितांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे.

कठुआमध्ये आरोपींकडून तपास यंत्रणेवर दबाव येऊ शकतो, प्रत्यक्षदर्शींना धमकावलं जाऊ शकतं. त्यामुळे तठस्थ ठिकाणी खटला चालवला जावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, पीडित कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य सुरक्षा द्यावी असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर सरकारला दिले आहे.

तिकडे कठुआच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली. पण सर्व आरोपींना आरोपपत्राची प्रत न मिळाल्याचा दावा आरोपींच्या वकीलांनी केला. यामुळे या प्रकरणाची सुवानणी आता २८ एप्रिलला होणार आहे. या प्रकरणात एकूण ८ आरोपी असून अल्पवयीन आरोपींना २४ एप्रिलला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

First published: April 16, 2018, 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading