काश्मिरात दहशतवाद्यांमध्ये फूट; एकमेकांच्या उठले जीवावर

jammu and kashmirमध्ये दहशतवाद्यांमध्ये फूट पडली असून ते आता एकमेकांचा जीव घेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 11:13 AM IST

काश्मिरात दहशतवाद्यांमध्ये फूट; एकमेकांच्या उठले जीवावर

नवी दिल्ली, आकाश हसन, 29 जून : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत. पण, आता घाटीमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये फूट पडताना दिसत आहे. दहशतवादी गटांची विचारधारा ही वेगवेगळी आहे.  त्यामुळे हेच दहशतवादी परस्परांच्या जीवावर उठले असल्याचं दिसून येत आहे. इंटेलिजन्सनं दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये प्रो इस्लामी आणि प्रो पाकिस्तानी दहशतवादी गट परस्परांविरोधात लढताना दिसत आहेत.

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार आदिल अहमद डार हा दहशतवादी सुरूवातीला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता. पण, विचारधारेवरून मतभेद झाले आणि त्यानं ISISला साथ दिली. यावेळी त्याच्यासोबतच्या आणखी 3 दहशतवाद्यांनी देखील ISIS ज्वाईन केली होती. यापैकी एक दहशतवादी हा हिजबुल मुजाहिद्दीन आणि दोन लष्कर ए तोयबाचे दहशतवादी होते. पण, काही काळानंतर तिन्ही दहशतवाद्यांनी आदिल डासची गोळ्या घालून हत्या केली होती.

राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानानंतर 150 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, यापूर्वी दहशतवाद्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यामध्ये तिन दहशतवादी हे आदिल डासला ISHPमध्ये सहभागी हो असं सांगताना दिसत आहेत.

Loading...

का पडतेय दहशतवाद्यांमध्ये फूट

दहशतवाद्यांमधील लढाई ही विचारांची लढाई आहे. परदेशी दहशतवादी आणि प्रो पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाईमुळे स्थानिक दहशतवादी त्रासले आहेत. ISHP आणि AGH इस्लामिक राज्य बनवण्यासाठी लढत आहेत. हे सर्व दहशतावादी दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात. यामध्ये स्थानिक दहशतवादी देखील सहभागी आहेत. त्यांना लोकांची सहानुभूती मिळत आहे.

वाढत्या कारवाया

दरम्यान, दहशतवाद्यांच्या कारवाया या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्याला देखील भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असून आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

VIDEO: सुप्रिया सुळे वारीत सहभागी, हाती वीणा आणि मुखी ज्ञानबा तुकारामचा नारा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...