जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का?

जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का?

पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यानचे संबंध तणावपूर्ण आहेत. फुटीरवाद्यांच्या अटकेनंतर आता खरोखर युद्धाला तोंड फुटणार का याची चिंता काश्मिरींना लागली आहे. श्रीनगरमध्ये पेट्रोलपंपांवर काश्मिरींनी रांगा लावल्या आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीच्या दृष्टीने दुकानांमधूनही सामान खरेदी करून ठेवलं जात आहे.

  • Share this:

श्रीनगर, 23 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानकडून दररोज नव्या घोषणा, नवी निवेदनं दिलं जात आहेत. दोन देशांच्या तणावपूर्ण संबंधांचा परिणाम सीमेवर दिसत आहे. त्यामुळे आता खरोखर युद्धाला तोंड फुटणार का याची चिंता काश्मिरींना लागली आहे. श्रीनगरमध्ये पेट्रोलपंपांवर काश्मिरींनी रांगा लावल्या आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीच्या दृष्टीने दुकानांमधूनही सामान खरेदी करून ठेवलं जात आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं कडक पावलं उचलायला सुरूवात केली.  हल्ल्यानंतर भारत सरकारनं फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता जम्मू - काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला अटक केली आहे. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून गृह मंत्रालयानं सैन्याच्या 100 तुकड्या देखील जम्मू - काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. यामध्ये सीआरपीएफच्या 35, बीएसएफच्या 35, एसएसबीच्या 10 आणि आईटीबीपीच्या 10 तुकड्यांचा समावेश आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारत दावा करत आहे आणि त्यावरूनच सीमेजवळ हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.

फुटीरतावादी उघडपणे पाकिस्तानशी संपर्क साधत असल्याचं यापूर्वी समोर आहे. पण, पुलवामा हल्ल्यानंतर मात्र सरकारनं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. दरम्यान, यासिन मलिकला अटक केल्यानंतर जम्मू - काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या अटकेचा निषेध केला आहे. ट्विटवरून त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अद्याप युद्धसदृश परिस्थितीचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत. सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'आमची लढाई काश्मिरी लोकांच्या विरोधात नसून काश्मीरसाठी आहे' असं म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संध्या संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थी आणि लोकांविरोधात लोकांमध्ये राग दिसून येत आहेत. परिणामी काश्मिरींना मारहाण झाल्याच्या अनेक घटना देखील देशभरातून समोर आल्या आहेत. या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. काश्मिरींना सध्या देशातील अनेक भागात मारहाण होत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. आमची लढाई ही काश्मिरींच्या विरोधात नसून काश्मीरसाठी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी म्हटलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'आता बस्स झालं' म्हणत पाकिस्तानविरोधातील आपली भूमिका अधिक कडक केली. सध्या भारतानं घेतली भूमिका पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याबाबत अमेरिकेनं दोन्ही देशांसोबत संपर्क साधला आहे. यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत लवकरच परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

First published: February 23, 2019, 10:23 PM IST

ताज्या बातम्या