काश्मीरमधल्या या फुटीरतावादी तरुणाला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधत तिकीट

काश्मीरमधल्या या फुटीरतावादी तरुणाला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधत तिकीट

सज्जाद हा विविध फुटीरतावादी गटांशी संबंधीत असून त्याने काश्मीरमध्ये निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी मोहीमही चावली होती.

  • Share this:

श्रीनगर 18 मार्च : लोकसभा निवडणुकीत सर्वाचं लक्ष लागलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघाकडे. 2014मध्ये उत्तर प्रदेशातल्या वाराणशी या मतदारसंघातून मोदी निवडून आले आहेत. यावेळी ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मोदींविरोधात विरोधीपक्ष कुणाला मैदानात उतरविणार याचीही सगळ्यांना उत्सुकता आहे.

असं असताना एका काश्मीरी तरुणाने मोदींविरोधात वाराणशीतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलीय. जम्मू आणि काश्मीरमधल्या कुलगाम इथल्या सज्जाद नूराबदी या 30 वर्षांच्या तरुणाने ही इच्छा व्यक्त केलीय. सज्जाद हा राजकीय कार्यकर्ता आहे. काश्मीरमधल्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी त्याला ही निवडणूक लढवायची आहे.

सज्जाद हा विविध फुटीरतावादी गटांशी संबंधीत असून त्याने काश्मीरमध्ये निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी मोहीमही चावली होती. त्यामळे त्याला पोलिसांनी अटकही केली होती. 15 दिवस तो पोलिसांच्या कोठडीत होता. असं असतानाही त्याने आता निवडणुकीच्या रिंगणात उतरून मोदींविरोधात लढण्याची घोषणा केलीय.

विरोधी पक्षांनी मला तिकीट द्यावं, त्यांनी तिकीट दिलं नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचंही सज्जादने म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी लोकसभेसाठी कुठला मतदारसंघ निवडणार याविषयी बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येत होत्या. ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातले वेगवेगळे मतदारसंघ चर्चेत होते. पण या सर्व शक्यतांवर पडदा घालत मोदी वाराणसीतूनच या वेळी उभे राहणार असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी News18 ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं.

भाजपला ओडिशात पक्षाची पकड मजबूत करायची आहे, त्यामुळे पंतप्रधान स्वतः वाराणसीऐवजी पुरीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात मोदी वाराणसीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्वतः राजनात सिंह यांनी सांगितलं. News18 नेटवर्कचे समूह संपादक राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत आपण स्वतः लखनौमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही राजनाथ म्हणाले. " लखनौच्या लोकांकडून मला खूप प्रेम मिळालं आहे. त्यामुळे मी लखनौ आणि मोदीजी बनारसमधून लढू", असंही ते म्हणाले.

2014 मध्ये नरेंद्र मोदी गुजरामध्ये वडोदरा आणि उत्तर प्रदेशात वाराणसी अशा दोन ठिकाणांहून लोकसभा निवडणूक लढले होते. त्यापैकी वाराणसीची जागा त्यांनी ठेवली होती आणि वडोदऱ्याची खासदारकी सोडली होती.

First published: March 18, 2019, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading