पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या 3 काश्मिरी विद्यार्थ्यांची इतरांनी केली धुलाई; तिघांनाही अटक

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या 3 काश्मिरी विद्यार्थ्यांची इतरांनी केली धुलाई; तिघांनाही अटक

पाकिस्तान जिंदाबादच्या गोषणा देणाऱ्या काश्मीरच्या तीन विद्यार्थ्यांची हुबळीत जोरदार धुलाई करण्यात आली. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

हुबळी (कर्नाटक), 15 फेब्रुवारी - पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. याच वेळी सर्व भारतीयांना चीड येणारी एक घटना कर्नाटकच्या हुबळी या शहरात घडली आहे. हुबळीमध्ये 3 काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाराज झालेल्या लोकांनी या तिघा विद्यार्थ्यांची धुलाई केली. यानंतर पोलिसांनी या तीनही विद्यार्थ्यांना अटक केली. हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त म्हणाले की, "जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली तेव्हा आम्ही त्यांना अटक केली. त्यांच्या कॉलेजनेही तक्रार दाखल केली आहे. आम्ही घटनेची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू. आताच काही अंदाज बांधणं योग्य ठरणार नाही"

कर्नाटकच्या हुबळी शहरामध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी 3 काश्मिरी विद्यार्थ्यांची जबरदस्त धुलाई केली. या तिनही विद्यार्थ्यांनी पुलवामा अतिरेकी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालेल्या दिवशीच पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केली. आणि या घोषमाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे विद्यार्थी हुबळीच्या केएलई इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत. व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कॉलेजमध्ये धुसून या विद्यार्थ्यांना चोप दिला.

घोषणाबाजी करणाऱ्या या तिन विद्यार्थ्यांची नावं आमिर, बासित आणि तालिब अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते आणि कॉलेजच्या वसतीगृहातच रहात होते. जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यामध्ये हे तिघेही आपली नावं सांगत आहेत. 'खाई है ये कसम, खाई है ये कसम, सुन ले दुश्मन सभी, है ये दिल की सदा.. पाकिस्तान झिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबाद' असं गाणं पार्श्वभूमीवर सुरू आहे.

व्हिडिओच्या मध्ये एक विद्यार्थी आझादीच्याही घोषणा देताना ऐकायला येतोय. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या तिघांनाही अटक केल्यानंतरही हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.

शाहीनबाग आंदोलक आणि अमित शाहांच्या भेटीचं वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळलं

पुलवामा हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीवर आली भाजी विकण्याची वेळ

 

First published: February 15, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading