मराठी बातम्या /बातम्या /देश /

काश्मिरी पंडितांवर पुन्हा हल्ला; दहशतवाद्यांकडून भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या झाडून हत्या

काश्मिरी पंडितांवर पुन्हा हल्ला; दहशतवाद्यांकडून भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

  • Published by:  Sunil Desale
पुलवामा, 2 जून: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)मधील पुलवामा (Pulwama) येथे दहशतव्यांनी भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्राल नगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष आणि पुलवामा जिल्हा भाजप युनिटचे सचिव राकेश पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या (BJP leader Rakesh Pandit shot dead by terrorist) केली आहे. राकेश पंडित यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्राल नगरपालिका समितीचे अध्यक्ष राकेश पंडित यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात राकेश पंडित हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतात सुरू होणार 8 नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी; महाराष्ट्रातील 'या' शहराचा समावेश भाजप नेते राकेश पंडित हे बुधवारी रात्री दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील आपल्या राहत्या घरातून बाहेर पडताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोळीबार केल्यावर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक घराबाहेर पडले. त्यावेळी राकेश पंडित हे जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांना तात्काळ स्थानिकांनी जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले. सुरक्षा दल आणि पोलिसांच्या पथकाकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन मोठ्या वेगाने सुरू आहे.
First published:

Tags: BJP, Jammu kashmir

पुढील बातम्या