मराठी बातम्या /बातम्या /देश /

'Kashmiri Not Allowed', हॉटेलमधील बोर्ड व्हायरल

'Kashmiri Not Allowed', हॉटेलमधील बोर्ड व्हायरल

नोएडातील हॉटेलमध्ये काश्मिरी लोकांना प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला आहे.

नोएडातील हॉटेलमध्ये काश्मिरी लोकांना प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला आहे.

नोएडातील हॉटेलमध्ये काश्मिरी लोकांना प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : Kashmiri Not Allowed नोएडातील एका हॉटेलमध्ये अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. पुलवामाचा रहिवासी असलेल्या आदिल दारनं स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यातील गाडीवर आदळली होती.या आत्मघातकी हल्ल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात संताप आहे. देशातील प्रत्येक भागात निदर्शनं आणि बंद पाळले जात आहेत.

त्यातच आता नोएडातील Kashmiri Not Allowed या बोर्डानं एकच चर्चा सुरू आहे. डेहराडून, चंदीगड सारख्या भागांमध्ये देखील काश्मिरी लोकांबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल रोष दिसून येत आहे. त्यातच आता या बोर्डाची भर पडली आहे. उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांचं हे हॉटेल असल्याची माहिती आता समोर येत आहे.

का लावला बोर्ड?

अमित जानी यांनी हा बोर्ड का लावला? असा सवाल आता विचारला जात आहे. त्यावर विचारले असता अमित जानी यांनी, 'माझ्या गेस्ट हाऊसमध्ये येणारे लोक याठिकाणी काश्निरी लोक राहत नाहीत ना?' असा सवाल करतात. 'काश्मिरी थांबले असल्यास आम्ही थांबणार नाही' असं म्हणतात. त्यामुळे मी Kashmiri Not Allowed असा बोर्ड लावल्याचं अमित जानी यांचं म्हणणं आहे.

पण, या नंतर देखील अमित जानी यांच्या या निर्णयामुळे वाद देखील होण्याची शक्यता आहे.

अमित जानी आणि वाद

अमित जानी आणि वाद काही नवीन नाहीत. अमित जानी यांनी अखलाख प्रकरणातील मुख्य आरोपींना निवडणुकीतून तिकीट देणार असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त पोस्टर लावल्यानंतर देखील अमित जानी चर्चेत आले होते.

===========================

VIDEO : राहु दे, धनंजय मुंडेंनी चहाचे दिले चक्क 2000 रुपये!

First published:

Tags: Terror attack