मराठी बातम्या /बातम्या /देश /

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,14 पेक्षा जास्त जण जखमी असल्याची भीती

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,14 पेक्षा जास्त जण जखमी असल्याची भीती

काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. बुरखाधारी बाइकस्वारांनी डेप्युटी कमिशनरांच्या कार्यालयावर ग्रेनेड हल्ला केला.

  • Published by:  Arti Kulkarni
श्रीनगर, 6 ऑक्टोबर : काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. बुरखाधारी बाइकस्वारांनी डेप्युटी कमिशनरांच्या कार्यालयावर ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये 14 जण जखमी झाल्याची भीती आहे. या जखमींमध्ये एक ट्रॅफिक कर्मचारी आणि एका पत्रकाराचाही समावेश आहे. हे अतिरेकी हल्ला करून फरार झाले. आता सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला आहे आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी जागोजागी तपास केला जातोय. काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतरचा हा दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. (हेही वाचा : साताऱ्यात उदयनराजेंची डोकेदुखी वाढली; नरेंद्र पाटलांनी माघार घेतली, पण...) अनंतनागमधल्या कडेकोट सुरक्षा असलेल्या या भागात सकाळी 11 वाजता हा हल्ला झाला. ग्रेनेडचं लक्ष्य चुकल्यामुळे हे बॉम्ब रस्त्याच्या जवळच फुटले. त्यामुळे तिथून जाणारे 14 जण जखमी झाले. उपचारानंतर यातल्या 13 जणांना घरी डिस्चार्ज देण्यात आला पण एक जण अजूनही हॉस्पिटलमध्येच दाखल आहे. या हल्ल्यानंतर इथे तणाव निर्माण झाला. अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याआधी, श्रीनगरच्या नवा कदल भागातही दहशचवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. =================================================================================

VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-411614" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDExNjE0/"></iframe>
First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorism

पुढील बातम्या