काश्मीरमधली दगडफेक रोखण्यासाठी असा काढणार हायटेक उपाय

काश्मीरमधली दगडफेक रोखण्यासाठी असा काढणार हायटेक उपाय

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांना कसं रोखायचं असा प्रश्न पोलिसांसमोर असतो. आता या दगडफेक करणाऱ्या तरुणांवर पॅलेटगन चालवली जाणार नाही. त्यांना पांगवण्यासाठी हायटेक सॉनिक गन वापरली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांना कसं रोखायचं असा प्रश्न पोलिसांसमोर असतो. आता या दगडफेक करणाऱ्या तरुणांवर पॅलेटगन चालवली जाणार नाही. त्यांना पांगवण्यासाठी हायटेक सॉनिक गन वापरली जाण्याची शक्यता आहे.

या सॉनिक गनद्वारे तीव्र स्वरूपाच्या आवाजांच्या फैरी झाडल्या जातात. त्यामुळे जमाव पांगला जातो. गृह मंत्रालयाने सशस्त्र पोलीस दलाला अशा सॉनिक गनच्या खरेदीचे आदेश दिले आहेत.

या बंदुका हवेमध्ये तीव्र स्वरूपाच्या ध्वनीलहरी निर्माण करतात. या आवाजामुळे समूहाला दडपता येतं.

अमेरिकेत वापर

अशा सॉनिक बंदुकांचा उपयोग अमेरिकेमध्ये पहिल्यांदा करण्यात आला होता. इथल्या जी - 20 परिषदेमध्ये हिंसक बनलेल्या आंदोलकांना काबूत आणण्यासाठी या बंदुका वापरल्या गेल्या.

'जातींच्या नावाने असलेल्या रेजिमेंट रद्द करा', दलित नेत्याचं मोदींना पत्र

आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

याआधी सततच्या दगडफेकीमुळे काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला होता. दगडफेक करणाऱ्या तरुणांवर नेमकी कशी कारवाई करायची याचं मोठं आव्हान लष्करासमोर होतं. म्हणूनच या समस्येवर हायटेक उपाय काढण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.

कायमचं बहिरं होण्याचा धोका

असं असलं तरी या सॉनिक बंदुका वापरण्याच्या पद्धतीवर टीकाही होते आहे. अशा बंदुकांमधून आवाजाच्या फैरी झाडल्या तर लोक कायमचे बहिरे होण्याचा धोका असतो. पण यावरही गृहमंत्रालयाने उपाय काढला आहे. त्यांच्या मते, कानांना इजा होणार नाही, अशा पद्धतीने या बंदुकांचा वापर करण्यात येईल.

आरोग्य संस्थांची परवानगी आवश्यक

या बंदुकांची खरेदी करायची झाली तर त्यामध्ये त्या माणसांच्या आरोग्याला किती हानीकारक आहेत याच्या चाचण्या घ्याव्या लागतील. तसंच या बंदुका वापरायच्या झाल्यास त्यासाठी भारतातल्या आरोग्य संस्थांची परवानगीही घ्यावी लागेल, असंही गृहमंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये म्हटलं आहे.

=============================================================================================

...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 08:09 PM IST

ताज्या बातम्या