काश्मीरमधल्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी केला ग्रेनेड हल्ला, 20 जण जखमी

काश्मीरमधल्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी केला ग्रेनेड हल्ला, 20 जण जखमी

ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झालाय. काश्मीरमधल्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये 20 जण जखमी झाले.

  • Share this:

श्रीनगर, 28 ऑक्टोबर : ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झालाय. काश्मीरमधल्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये 20 जण जखमी झाले. सोपोर बस स्टँडजवळ प्रवाशांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात जखमी झालेल्या 3 जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

हल्ल्यानंतर आता सुरक्षा दलं सतर्क झाली असून त्यांनी या भागाला वेढा घातला. याठिकाणी लपून बसलेल्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले जातायत.

CRPF च्या 179 क्रमांकाच्या तुकडीने हल्ल्याच्या ठिकाणी घेराव घातला. पोलिसांनी हल्लेखोर अतिरेक्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. असं असलं तरी आतापर्यंत कोणालाही पकडण्यात आलेलं नाही.

(हेही वाचा : बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत,IMF च्या रिपोर्टमुळे चिंता वाढली)

याआधी श्रीनगरच्या काका सरायमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर हल्ला केला होता. यामध्ये 6 जवान जखमी झाले होते.हा हल्ला केरन पोलीस स्टेशनवर संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी झाला. यामध्ये जखमी झालेल्या जवानांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  त्याआधीही कुलगाम जिल्ह्यात CRPF च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला झाला होता.

==========================================================================================

VIDEO : शरद पवारांच्या भेटीनंतर आबांचा मुलगा रोहित म्हणतो...

Published by: Arti Kulkarni
First published: October 28, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading