काश्मीरमध्ये CRPF जवानांवर अतिरेक्यांचा ग्रेनेड हल्ला, 6 जवान जखमी

काश्मीरमध्ये श्रीनगरच्या काका सराय भागात अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 6 जवान जखमी झाले.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 08:44 PM IST

काश्मीरमध्ये CRPF जवानांवर अतिरेक्यांचा ग्रेनेड हल्ला, 6 जवान जखमी

श्रीनगर, 26 सप्टेंबर : काश्मीरमध्ये श्रीनगरच्या काका सराय भागात अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 6 जवान जखमी झाले. CRPF आणि पोलीस दलाच्या जवानांवर अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या भागाला वेढा घातला. या पूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी काका सराय भागात CRPF च्या बंकरवर हा हल्ला केला. यामध्ये 6 जवान जखमी झालेत.

Loading...

हा ग्रेनेड हल्ला केरन नगर पोलीस स्टेशनवर संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या 6 जवानांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी CRPF च्या जवानांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला झाला होता. कुलगाम जिल्ह्यातल्या चवलगाम भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवानही जखमी झाला.

(हेही वाचा : 'या तिघांनाही द्या भारतरत्न', काँग्रेस नेत्याने मोदींना लिहिलं पत्र)

===================================================================================

VIDEO : राष्ट्रवादीकडून नवा विरोधी पक्षनेता कोण? 'या' नावांची चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...