लष्कराने केली पुन्हा एकदा 'कारगिल'वर चढाई, हे आहे कारण

लष्कराने केली पुन्हा एकदा 'कारगिल'वर चढाई, हे आहे कारण

'पाकिस्तानने 1999मध्ये कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचं जे धाडस केलं. आता पुन्हा ते धाडस करण्याची हिंम्मत पाकिस्तान करणार नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 7 जुलै : भारताने कारगिलवर मिळवलेल्या विजयाला 20 वर्ष होताहेत. दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभीमीवर लष्कराकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काश्मीर रायफल्स आणि 18 Grenadiers च्या जवानांनी 'कारगिल'ट्रेकचं आयोजन केलं होतं. या जवानांनी 'बात्रा टॉप' आणि 'टायगरहिल' पर्यंत चढाई केली. 3 मे 1999 रोजी कारगिलवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करत तळ ठोकल्याची बातमी पुढे आली. त्यानंतर भारताने कारवाई करण्याचा निर्णय घेत जमीन आणि हवाई हल्ले केले आणि पाकिस्तानला त्या भागातून हुसकावून लावलं. 26 जुलै 1999 रोजी ही कारवाई संपली होती. तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून पाळला जातो.

 पाकिस्तान 'कारगिल'सारखं धाडस पुन्हा करणार नाही

भारत आता खूप बदललाय, पाकिस्तानने 1999मध्ये कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचं जे धाडस केलं. आता पुन्हा ते धाडस करण्याची हिंम्मत पाकिस्तान करणार नाही असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केलंय. याचं कारण म्हणजे असं केलं तर काय होतं याचा धडा पाकिस्तानला मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा अशी मुजोरी करणार नाही असंही ते म्हणाले.

संजय निरुपम आणि मिलिंद देवरांमध्ये या मुद्यावर पेटला वाद

'ऑपरेशन विजय'ला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रावत म्हणाले, आता भारताची दक्षता कमालीची वाढलीय. सीमेवरच्या प्रत्येक भागावर आमची नजर असते. भारताची शस्त्र सज्जताही वाढली आहे. असा आगावूपणा केला तर काय होऊ शकतं हे आम्ही पाकिस्तानला दाखवून दिलं आहे असंही ते म्हणाले.

लष्करात येणार आणखी एक अस्त्र

पाकिस्तानातल्या बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांनी सज्ज होणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी 200 कोटींचा करार भारताने रशियासोबत केलाय. MI-35 या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार असून त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे.

आज सरकार मीच आहे', पंकजा मुंडेंच्या विधानाची पुन्हा चर्चा

भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवढ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते. आपल्या खेरदीपैकी 70 टक्क्यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे. अचूक निशाणा आणि अजस्त्र क्षमता या नव्या क्षेपणास्त्रांची असणार आहे.

First published: July 7, 2019, 9:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading