श्रीनगर, 5 जुलै : काश्मीरमध्ये श्रीनगर आणि जम्मू या शहरांना जोडणाऱ्या मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक राज्यांत मेट्रो प्रकल्प झाले आहेत. पण नैसर्गिक सौंदर्य न्याहाळत प्रवास करण्याचा आनंद या मेट्रोमुळे मिळणार आहे.
हा मेट्रोचा मार्ग हा देशातला सर्वात सुंदर मेट्रोचा मार्ग असेल, असा सरकारचा दावा आहे. ही योजना चार वर्षात पूर्ण करण्याचा विचार आहे.जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही घोषणा केली.
ही मेट्रो लाइट रेल्वे सिस्टीम या तंत्रज्ञानावर आधारित असेल. यामुळे ती कमी आवाज करणारी, जास्त आरामदायी असणार आहे. तसंच या मेट्रोमुळे काश्मीरच्या सौंदर्याचं दर्शन प्रवाशांना घडणार आहे. या मेट्रोने गेलं तर आसपसाच्या सुंदर ठिकाणांना भेट देणंही शक्य होईल.
'स्पाईस जेट'च्या अपघातग्रस्त विमानाला हटविण्यात तीन दिवसानंतर यश
जम्मू ते श्रीनगरमधला पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे एकूण 4 टप्पे असतील.
या भागात जाणार मेट्रो
HMT, इंद्रा नगर, बेमिना, उस्मानाबाद, हजारीबाग या सगळ्या ठिकाणांना ही मेट्रो जोडेल. या मार्गात प्रत्येक 25 किलोमीटरवर स्टेशन असेल. अशी 24 स्टेशन बनवली जाणार आहेत.
स्मार्ट बसेसही धावणार
मेट्रोसोबतच काश्मीरसाठी स्मार्ट बसेस आणण्याचाही प्रस्ताव आहे. या बसेसमध्ये ऑटोमॅटिक तिकीटचीही सुविधा असेल.
मेट्रो आणि स्रार्ट बसेसच्या या योजनेमुळे जम्मू आणि श्रीनगर ही दोन्ही शहरं जोडली जातील. शिवाय इथल्या भागांचा विकास होईल. काश्मीरचे नागरिक आणि जगभरातून इथे येणाऱ्या पर्यटकांसाठीच हे मोठं आकर्षण ठरू शकतं.
===========================================================================================
VIDEO: ...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी या पोलिसांकडे सोपवले खेकडे