Home /News /national /

हा भयानक VIDEO पाहून उघडतील डोळे; लोकांच्या सुरक्षेसाठी जिवावर उदार होऊनही आपल्या लष्कराला काश्मिरात झेलावं लागतंय हे

हा भयानक VIDEO पाहून उघडतील डोळे; लोकांच्या सुरक्षेसाठी जिवावर उदार होऊनही आपल्या लष्कराला काश्मिरात झेलावं लागतंय हे

हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी रियाझ नायकू याला चकमकीत ठार केल्यानंतरचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    नवी दिल्ली, 7 मे : हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी रियाझ नायकू याला चकमकीत ठार केल्यानंतरचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये पुलावामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी रियाझला टिपलं. बुधवारी म्हणजे 6 मे रोजी हिज्बुलचा हा कमांडर ठार झाला. भारतीय सुरक्षा दलांचं हे मोठं यश मानलं जात आहे. पण या यशानंतर स्थानिक असंतुष्ट लोकांनी मात्र काश्मिरात लष्कारालाच लक्ष्य केलं आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना किती भयानक परिस्थितीत काम करावं लागतं आणि संयम न सोडता, हातात शस्त्र असूनदेखील प्रतिकाराला कशा मर्यादा येतात हे या व्हिडीओतून दिसेल. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. तो काश्मिरी दहशतवादाचा नवा चेहरा बनू पाहात होता.  काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना हे मोठं यश कसं मिळाली, याची माहिती आता समोर येत आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईत एकही निष्पाप नागरिक मारला गेला नाही किंवा जखमीही झाला नाही. रात्रीत सापळा रचून दहशतवाद्याला लक्ष्य केलं गेलं. रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. वाचा - हिज्बुलचा कमांडर रियाझ नायकूचा खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा? पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. पण तो मारला गेल्याची बातमी कळताच स्थानिक समर्थकांनी लष्कर आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. सुरक्षा दलाची एक गाडी हेरून त्यावर अमानुष हल्ला करणारे लोक या VIDEO मध्ये दिसत आहेत. 5 मे रोजी संध्याकाळी उशिरा रियाझबद्दलची माहिती सुरक्षा दलांना समजली. त्यानंतर रात्रीच गुप्त कारवाईला सुरुवात झाली. रियाझ लपला होता त्या जागी पहाटे 2 च्या सुमारास जवान पोहोचले. आसपासच्या घरांमधल्या नागरिकांना सूचना देत त्यांना तिथून हटवण्यात आलं. सकाळी साडेनऊ वाजता दहशतवाद्यांशी पहिल्यांदा संपर्क केला गेला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. सुमारे 4 तास ही धुवांधार चकमक सुरू होती. अखेर दुपारी 1 च्या सुमारास सुरक्षा दलांनी रियाझला अलगद टिपलं. त्याच्याबरोबर असलेला आणखी एक दहशतवादी या चकमकीत मारला गेला. 10 वर्षांपूर्वी असं काय झालं? 2010 मध्ये काश्मीरमध्ये काही युवकांनी निदर्शनं केली. तिथे गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला. त्या अश्रुधुराची नळकांड्यापैकी एक लागल्याने अहमद मट्टो नावाचा 17 वर्षांचा तरुण मरण पावला. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकला. अनेक तरुण आंदोलनात उतरले. त्यात एक रियाझ नायकू होता. पोलिसांनी या भडकलेल्या तरुणांना अटक केली, त्यात रियाझही होता. 2012 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर वडिलांकडे पुढील शिक्षणासाठी 7000 रुपये घेऊन रियाझ घराबाहेर पडला. भोपाळच्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेणार असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं. पण त्यानंतर तो घरी परतलााच नाही. काही महिन्यांनी घरच्यांना तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं कळलं. त्या दिवसापासून त्याचा आमच्याशी संबंध संपला, असं त्याचे वडील सांगतात. अन्य बातम्या नेत्यांच्या बैठकीत काय घडलं?फडणवीसांनी दिली ग्वाही तर उद्धव ठाकरे म्हणाले... जून, जुलै असणार सर्वात जास्त धोकादायक! एम्सच्या संचालकांनी केला मोठा खुलासा
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या