S M L

...याची किंमत चुकवावी लागेल, संरक्षणमंत्र्यांचा पाकला इशारा

संजुवनमधील लष्करी मोहिम संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2018 10:48 PM IST

...याची किंमत चुकवावी लागेल, संरक्षणमंत्र्यांचा पाकला इशारा

12 फेब्रुवारी : संजुवन लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता अधिक कडक धोरण अवलंबण्याच्या पवित्रा घेतलाय.  वारंवार पुरावे सादर करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल, असा गर्भित इशाराच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिला आहे.

संजुवनमधील लष्करी मोहिम संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली.

संजुवनमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे.

मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी पाकला इशारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 10:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close