काश्मीरमधली निवडणूक आणखी पुढे, या महिन्यात होण्याची शक्यता

जम्मू काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. गेल्या जून महिन्यात भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर काश्मीरमधलं सरकार कोसळलं. या राजकीय घडामोडींनंतर काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 06:28 PM IST

काश्मीरमधली निवडणूक आणखी पुढे, या महिन्यात होण्याची शक्यता

नवी दिल्ली, 26 एप्रिल : जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकासांठीचं मतदान झालं पण आता विधानसभा निवडणुका कधी घेतल्या जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. याआधी इथे जूनमध्ये निवडणुका होतील, असं म्हटलं जात होतं पण आता या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे जातील, असा अंदाज आहे.

निवडणूक पुढे का?

रमझानची यात्रा, पर्यटनाचा हंगाम आणि बकरवाल लोकांचं स्थलांतर या कारणांमुळे ही निवडणूक पुढे ढकलल्याचं कारण सरकारने दिलं आहे.

जूनमध्ये काढला पाठिंबा

जम्मू काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. गेल्या जून महिन्यात भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर काश्मीरमधलं सरकार कोसळलं. या राजकीय घडामोडींनंतर काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली.

Loading...

३ सदस्यांची समिती

याआधी मार्च महिन्यात निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा यांनी काश्मीरमध्ये तीन सदस्यांच्या एका समितीला पाठवण्यात येईल, असं म्हटलं होतं. ही समिती इथल्या सुरक्षेचा आढावा घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या यावर निर्णय घेईल, असंही ते म्हणाले होते.

निवडणुकांची मागणी

काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणांसाठी लोकसभेच्या निवडणुकांसोबत विधानसभा निवडणुका घेता येणार नाहीत, असं आयोगाने म्हटलं होतं. काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायला उशीर झाल्यामुळे राज्यात निदर्शनं होत होती. इथे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या, अशी या निदर्शकांची मागणी आहे.

विरोधकांची टीका

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी निवडणुकांना उशीर केल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.

काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येईल, असं आधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. पण नंतर मात्र सुरक्षेच्या कारणासाठीच इथल्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला काश्मीरची विधासभा बरखास्त करण्यात आली होती.

=====================================================================

VIDEO: भाजपच्या 'या' मुस्लीम नेत्यानं साध्वी प्रज्ञांचा प्रचार करण्यास दिला थेट नकारबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2019 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...