VIDEO : Article 370 : इस्लामाबादमध्ये संजय राऊत यांची पोस्टर्स, पाकिस्तानमध्ये हडकंप

VIDEO : Article 370 : इस्लामाबादमध्ये संजय राऊत यांची पोस्टर्स, पाकिस्तानमध्ये हडकंप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केलं होतं. यानंतर आता इस्लामाबादमध्ये महाभारत - स्टेप फॉरवर्ड असं लिहिलेली पोस्टर्स लागली आणि यामध्ये संजय राऊत यांचं नाव आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केलं होतं. आज जम्मू काश्मीर घेतलं आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, अशी गर्जना त्यांनी राज्यसभेत केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणाले.

यानंतर आता इस्लामाबादमध्ये महाभारत - स्टेप फॉरवर्ड असं लिहिलेली पोस्टर्स लागली आणि यामध्ये संजय राऊत यांचं नाव आहे. ANI या वृत्तसंस्थेने केलेलं ट्वीट या पोस्टरवर आहे आणि त्यात संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते लिहिलं आहे.

साजिद नावाच्या एका पाकिस्तानी तरुणाने हे पोस्टर दाखवणारा हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. आपल्या देशात भारतातले लोक अशा पद्धतीची पोस्टर्स लावत आहेत आणि आपण काय करत आहोत, असा सवाल त्याने विचारला आहे. इस्लामाबादमध्ये जागोजागी अशी पोस्टर्स कशी काय लागू शकतात, असाही त्याचा सवाल आहे.

त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत हा व्हिडिओ फिरतो आहे.इस्मालाबादमधली ही पोस्टर्स पाकिस्तानी पोलिसांनी काढून टाकली. त्यावेळचा व्हिडिओही काही लोकांनी शेअर केला.

पाकिस्तानमध्ये ही पोस्टर्स कुणी लावली याबद्दल मात्र काही कळू शकलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नाचक्की करणारी ही पोस्टर्स इथे कुणी लावली याचा पोलीस शोध घेत आहेत.

===================================================================================================

 

VIDEO : सुप्रिया सुळेंच्या शंकांवर अमित शहांनी हे दिलं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 07:15 PM IST

ताज्या बातम्या