पाहा VIDEO : कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ही आहे स्थिती, पहिला व्हिडिओ आला बाहेर

पाहा VIDEO : कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ही आहे स्थिती, पहिला व्हिडिओ आला बाहेर

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काश्मीरमध्ये कोणत्याही स्वरूपाची घातपाताची घटना घडू नये यासाठी इथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 7 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. श्रीनगरमध्ये काही गाड्यांची वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर रस्त्यावर माणसांचीही ये - जा होतेय.

काश्मीरमध्ये सगळीकडेच कडेकोट बंदोबस्त आहे. बंदुकीच्या छायेत वावरणारं काश्मीर शांत आहे. हा व्हिडिओ ANI या न्यूज एजन्सीने ट्वीट केला आहे. काश्मीरमधली स्थिती दाखवणारा हा पहिला व्हिडिओ आहे.काही तातडीचं काम असेल तरच लोक घराबाहेर पडतायत. फूटपाथवर दुकानं थाटून उपजिविका करणारे काही लोक रस्त्यावर दिसू लागलेत.

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काश्मीरमध्ये कोणत्याही स्वरूपाची घातपाताची घटना घडू नये यासाठी इथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासोबतच काश्मीरचं विभाजन करण्याच्या प्रस्तावालाही संसदेने मंजुरी दिली. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लड़ाख हे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत.

असं केलं प्लॅनिंग

अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यानंतर लगेचच काश्मीर प्रश्न सोडवण्याला आपलं प्राधान्य राहील हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अधिकारी सतर्क झाले आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या हालचालीही वाढल्या.

राजकीय डावपेचात माहीर असलेल्या अमित शहांनी त्यांच्या अजेंड्याची अमलबजावणी करायला सुरुवात केली. अमित शहांनी स्वत: श्रीनगरचा दौरा केला आणि कलम 370 रद्द केलं तर त्याचे काय परिणाम होतील याचाही अंदाज घेतला. यासाठीच अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत लांबवण्यात आलं.

============================================================================================================

VIDEO: ट्रॅकवर येऊन थेट गजराजाने रोखली ट्रेन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 03:24 PM IST

ताज्या बातम्या