PHOTO : कलम 370 हटवल्यानंतर दल लेकपासून ते लाल चौकपर्यंत... ही आहे काश्मीरमधली परिस्थिती

काश्मीरमधलं 370 कलम हटवल्यानंतर श्रीनगर आणि जम्मूमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणच्या संचारबंदीमुळे रस्ते ओस पडले आहेत. काश्मीरमधल्या पर्यटकांनीही परतीचा मार्ग धरला आहे. पाहूया काश्मीरमधले हे फोटो

  • Share this:

काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केल्यामुळे दल लेकमधले शिकारे नांगरून ठेवण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आल्यानंतर यात्रेकरूंनी काश्मीरमधून परतीचा मार्ग धरला.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली.

जम्मूमध्येही बाजारपेठा पूर्ण बंद आहेत. त्याठिकाणचा ताबा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

काश्मीरमधल्या रस्त्यांवर सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. कोणतीही घातपाताची घटना घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.

काश्मीरमधल्या पर्यटकांनीही श्रीनगर सोडून परतीचा मार्ग धरला आहे.

जम्मूमध्ये कर्फ्यू लावण्यात आल्याने वाहनं अडवून धरण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या